Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

उडानच्या मदतीने पाथर्डी तालुक्यात बालविवाह रोखला

आई-वडिलांकडून घेतले लेखी । बालकल्याण समितीसमोर दोन्ही कुटुंबाला हजर राहण्याचे आदेश

पाथर्डी । वीरभूमी- Feb 22, 2025 • 04:45 PM 2061 views
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात 17 वर्षे 8 महिने वयाच्या मुलाचे वय आणि 17 वर्षे 1 महिना 8 दिवस वयाच्या मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. एका सजग नागरिकाने उडान हेल्पलाइन 9011026495 आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर दिलेल्या माहितीमुळे प्रशासनाने वेळीच पाऊल उचलले आणि हा बालविवाह रोखण्यात यश आले. बालविवाहाची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी एस. एम. गोल्हार, ग्राम बालसंरक्षण समितीच्या अध्यक्ष व सरपंच मंदाबाई शिवराम बुधवंत, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तातडीने माहीती दिली.

संयुक्त पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मुलीच्या घरी लग्नासाठी मंडप उभारलेला दिसला आणि विवाहाच्या तयारीला वेग आला होता. प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट झाले की, मोठ्या बहिण-भावाचे लग्न सुरू असताना अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह लावण्याचा कट होता. परंतु पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत हा विवाह रोखला. प्रशासनाने आई-वडिलांकडून लेखी जबाब नोंदवून घेतला की, मुलीचे 18 वर्षे आणि मुलाचे 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचे लग्न लावले जाणार नाही. तसेच, बालकल्याण समितीसमोर दोन्ही कुटुंबांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. या दोघांचे समुपदेशन करून त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. जयंत ओहळ, सदस्य अ‍ॅड. अनुराधा येवले, तुषार कवडे, रोहिणी कोळपकर तसेच स्नेहालय उडान प्रकल्पाच्या संचालक अ‍ॅड. बागेश्री जरंडीकर, हनिफ शेख, चाइल्ड हेल्पलाइन केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी, आणि उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यशस्वी कारवाईसाठी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, पाथर्डी पोलिस स्टेशनचे अधिकारी संतोष मुटकुळे आणि स्थानिक ग्रामपंचायत यंत्रणेच्या सहकार्यामुळे मोठे यश मिळाले. या उल्लेखनीय कार्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कौतुक करण्यात आले आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत बालविवाह करणे किंवा त्यास सहकार्य करणे हा कायद्याने गुन्हा आहे. दोषींवर एक वर्ष कारावास आणि दोन लाख रुपये दंडाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही लग्नाला जाण्यापूर्वी खात्री करा. मुलगी 18 वर्षांची आहे का? मुलगा 21 वर्षांचा आहे का? अन्यथा, सहभागी होणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. जर कुठेही बालविवाह होत असल्याची शक्यता वाटत असेल, तर तातडीने खालील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

चाइल्ड हेल्पलाइन नं.- 1098, स्नेहालय उडान हेल्पलाइन नं.- 9011026495 तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल. बालविवाह रोखणे ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाने जागरूक राहून पुढाकार घेतल्यास आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित होईल!

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply