Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

म्हस्के यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार

राज्य शासनाकडून सन 2023, सन 2024 चे पुरस्कारार्थींची नावे जाहीर

अहिल्यानगर । वीरभूमी- Apr 15, 2025 • 03:56 PM 1786 views
महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे ‘राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर झाले असून सन 2022-23 व सन 2023-24 चे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून यावर्षीचा पुरस्कार कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रमोद आसाराम म्हस्के यांना तर मागील वर्षीचा पुरस्कार तिगाव (ता. संगमनेर) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतिष भाऊसाहेब गाडेकर यांना जाहीर झाला आहे.

राज्य शासनाच्यावतीने शासन निर्णयाद्वारे पुरस्कारार्थींची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभागातून मागील वर्षी 33 व यावर्षी 32 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यावर्षीचा नाशिक विभागातून अहिल्यानगर जिल्ह्यातून ‘राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रमोद आसाराम म्हस्के यांना तर मागील वर्षीचा पुरस्कार तिगाव (ता. संगमनेर) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतिष भाऊसाहेब गाडेकर यांना जाहीर झाला आहे.

लवकरच या पुरस्काराचे वितरण यशवंत पंचायत अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामविकास मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.

ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांना या अगोदर जिल्हास्तरीय आदर्श ग्रमसेवक पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांनी या अगोदर कासार पिंपळगावला स्मार्ट ग्राम, निर्मलग्राम पुरस्कार मिळवून दिले आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामसेवक म्हस्के व गाडेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply