Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरु । उमेदवारीसाठी करावी लागणार कसरत

पाथर्डी । वीरभूमी- Jun 13, 2025 • 05:28 PM 1243 views
महानगर पालिका व नगरपालिकांचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार दि. 14 जुलै 2025 पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या अधिसूचनेवर दि. 21 जुलैपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. दाखल हरकतींची सुनावणी दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी होऊन त्यानंतर अंतिम प्रभाग रचना दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात येईल. याबाबतचे आदेश राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज पारित केले.

पाथर्डी तालुक्यामध्ये माळीबाभुळगाव, टाकळीमानुर, मिरी, भालगाव, कासार पिंपळगाव असे पाच जिल्हा परिषद गट आहेत. त्या अंतर्गत कासार पिंपळगाव, कोरडगाव, भालगाव, अकोला, मिरी, करंजी, माळीबाबुळगाव, तिसगाव, माणिकदौंडी व टाकळीमानुर असे पंचायत समितीचे दहा गण आहेत. यामध्ये फारसे बदल होतील अशी शक्यता नाही, कारण या आदेशामध्ये नवीन गट व गणाची निर्मिती सुचविण्यात आलेली नाही.

नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होतील असे निश्चित मानुन इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. मात्र वरीष्ठ पातळीवर या निवडणुका एकत्र लढविल्या जाणार की स्वतंत्र याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असल्याने पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना मोठी कसरत करावी लागेल असे चित्र दिसत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply