Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

शेवगाव पोलिसांची दमदार कामगिरी । एकाला अटक

शेवगाव । वीरभूमी- Jun 24, 2025 • 05:46 PM 3176 views
तालुक्यातील हातगाव येथील कैलास काकासाहेब काकडे (वय 42) याची बोधेगाव येथे खून झाल्याची घटना शुक्रवार दि. 20 रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली होते. या घटनेतील आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र शेवगाव पोलिसांनी तांत्रिक व भौतिक पुराव्याच्या मदतीने तपास करुन खुनातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या घटनेतील आरोपीचे नाव सिद्धांत मंगेश गवारे (वय 23, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे असून आरोपीने किरकोळ वादातून कैलास काकडे याचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कोणतेही धागेदोरे नसतांना शेवगाव पोलिसांनी आरोपीस शोधून अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील कैलास काकासाहेब काकडे (वय 42) हे गुरुवार दि. 19 जून रोजी पत्नीसह बोधेगाव येथे आले होते. यावेळी मी बाथरूमला जावून येतो तू छत्रपती बँकेसमोर थांब असे पत्नीला सांगून गेले होते. मात्र कैलास काकडे लवकर न आल्याने त्यांची पत्नी गावाकडे घरी निघून गेली होती. त्यानंतर शुक्रवार दि. 20 रोजी सकाळी 8 वाजता कैलास काकासाहेब काकडे हे शेवगाव ते गेवराई रोडवरील हॉटेल राकाच्या समोर मृतावस्थेत आढळून आले. अज्ञात कारणाने कोणत्यातरी टणक हत्याराने पाठीवर, डोक्यावर जबर मारहाण करुन जीवे ठार मारले होते.

मयत कैलास काकडे यास दारु पिण्याचे व्यसन असून त्याचेकडे लोकांचे उसने पैसे झाल्याने त्याने 15 दिवसांपूर्वी त्याचे वाट्याला आलेली एक एकर जमिनीपैकी अर्धा एकर जमिन विकली होती. यामुळे कैलास काकडे यांची हत्या पैश्याच्या देवाणघेवाणीवरुन झाल्याचा संशय होता. यावरुन मयताचा भाऊ विलास काकासाहेब काकडे यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात गुरनं. 552/2025 भारतीय न्याय संहीता कलम 103 (1) प्रमाणे दि. 22/6/2025 रोजी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि. संतोष मुटकुळे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी दोन पथके बोधेगाव, बालमटाकळी, हातगाव, कांबी भागात रवाना करण्यात आले होते. तपास सुरु असतांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक व भौतिक पुराव्याच्या आधारे संशयित आरोपी सिद्धांत मंगेश गवारे (वय 23, रा. बोधेगाव) यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

कैलास काकडे हा आरोपीच्या घरासमोर येवून विनाकारण शिविगाळ करत होता. याचा राग येवून टणक वस्तुने त्याला मारहाण केल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपी सिद्धांत मंगेश गवारे याला अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे, पोसई. प्रविण महाले, पोसई. बाजीराव सानप, पोहेकॉ. किशोर काळे, पोहेकॉ. चंद्रकांत कुसारे, पोहेकॉ. परशुराम नाकाडे, पोना. उमेश गायकवाड, पोना. ईश्वर गर्जे, पोकॉ. शाम गुंजाळ, पोकॉ. संतोष वाघ, पोकॉ. राहुल खेडकर, पोकॉ. प्रशांत आंधळे, पोकॉ. एकनाथ गर्कळ, पोकॉ. संपत खेडकर, पोकॉ. ईश्वर बेरड, पोकॉ. राजू बडे, पोकॉ. भगवान सानप, पोकॉ. देविदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकॉ. राहुल गुडु यांनी केली आहे. पुढील तपास पोनि. संतोष मुटकुळे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply