Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

देवाची आरती करण्यावरुन दोन समाजात धार्मीक तणाव

जवखेडे खालसा येथील घटना । खबरदारी म्हणुन गावात दंगल नियंत्रण पथक तैनात

पाथर्डी । वीरभूमी - Jun 19, 2025 • 11:32 PM 2671 views
तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबूळ देवस्थान येथे गुरुवारी देवाची आरती करण्यावरून दोन समाजात धार्मिक तणाव निर्माण होऊन जातीय तणाव वाढला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी गावामध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने येत्या शनिवारी बैठकीचे आयोजन केले आहे.

तालुक्यातील तिसगाव नंतर जवखेडे खालसा येथे जातीय तणाव निर्माण होऊन दोन समाजामध्ये समोरासमोर शाब्दिक चकमक घडली. एका गटाने दुसर्‍या गटातील काही जणांना मारहाण सुद्धा केली त्याची तक्रार देण्यासाठी सायंकाळी उशिरा तेथील तरुण पोलीस स्टेशनला आले.

जवखेडे येथे कानिफनाथांचे स्थान असून मुस्लिम बांधव सुद्धा हे स्थान आमच्या धर्माचे आहे असा दावा करतात. गेले काही वर्षांपासून देवस्थानच्या माध्यमातून येथे दोन समाजामध्ये तणावाची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी येथे विशिष्ट समाजाच्या लोकांनी केलेले अतिक्रमण हटवावे म्हणून उपोषण आंदोलन करण्यात आले. त्याची दखल घेत तालुका प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवल्याने काही काळ तणाव निवळला. त्यानंतर आज हिंदू पूजा पद्धतीप्रमाणे आरती करण्यावरून मतभेदाचे रूपांतर शाब्दिक चकमक व धक्काबुक्कीत झाले.

या घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, शेवगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष मुटकुळे, पाथर्डीचे निरीक्षक विलास पुजारी यासह मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथक व वाढीव बंदोबस्त तात्काळ घटनास्थळी पोहोचला. काही वेळात तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी येथील तणाव मात्र संपलेला नाही. येथील परिस्थिती पाहता पोलीस व महसूल प्रशासनाने दोन्ही गटाशी समन्वयाची चर्चा करत येत्या शनिवारी पुन्हा एकदा बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.

आज गुरुवारच्या दिवशी आरती करण्यासाठी स्थानिक तरुण मंदिरात पोहोचले होते. त्यावेळी आरती करण्याच्या पद्धतीवरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर समाज माध्यमांवर येथील तणावाची परिस्थिती व्हायरल झाल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्ते जवखेडे येथे येण्यासाठी निघाले होते परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना तेथेच रोखले. सुमारे तीन तास समन्वयाची बैठक पार पडूनही सर्वमान्य तोडगा निघू शकला नाही.

जवखेडे शिवारातील तांबुळ देव येथे चैतन्य कानिफनाथ मढी येथे जाण्यापूर्वी काही काळ विश्रांती घेतली. तांबूल म्हणजे पानाचा विडा खाऊन त्यांनी पानाचा चोथा ज्या जागेवर टाकला, त्या जागेचे नाथ संप्रदायिकांच्या दृष्टीने महत्त्व वाढून तांबूल खाऊन चोथा स्वरूपात नाथांनी येथे टाकलेला प्रसाद त्याला देवत्व मानत तांबूल देव म्हणून त्याची माहिती पुढे आली. नवनाथ भक्तिसार ग्रंथातही या स्थानाचा ओझरता उल्लेख आहे, असे भाविकांचे म्हणणे आहे.

या वादाचे मुख्य कारण देवस्थानची इनाम जमीन व त्या जागेला लागलेले वक्फ बोर्डाचे नाव असे असून त्याबाबत आजच्या बैठकीत जाहीर चर्चा झाली नाही. यावेळी सरपंच चारुदत्त वाघ, अमोल वाघ, अ‍ॅड. वैभव आंधळे, हरिश्चंद्र आव्हाड, अमोल वाघ, लतीफ शेख, शहाबुद्दीन शेख, चांद सय्यद, इसाक शेख, मुस्ताक शेख आदी दोन्ही समाजातील कार्यकर्ते, वरिष्ठ पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाढीव बंदोबस्त गावात तैनात असून स्थानिक भाविकांनी मिरी, पांढरीपूल, माका, नेवासाफाटा, करंजी, घोडेगाव, तिसगाव, मढी, कासार पिंपळगाव या भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे. स्थानिक प्रशासनाकडून या भागातील तणाव फारसा गांभीर्याने घेतला जात नसल्याने कुठल्याही क्षणी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे वातावरण तयार झाले आहे.

मढी, तिसगाव, निवडुंगा, पासून तालुक्याचा संपूर्ण पश्चिम भाग सध्या अत्यंत संवेदनक्षम बनला असून पोलिसांकडून हा विषय फारसा गांभीर्याने घेतला जात नाही. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा हा भाग मतदारसंघ असल्याने भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी सुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली.

तिसगाव येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रस्ताव मंजूर असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जवखेडे-मिरी परिसरात मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जवखेडे येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून तेथे खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, असे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply