Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

पाथर्डी पोलिसांनी स्विकारली फिल्मी स्टाईल लाच

दोन पोलिसांसह अटकेतील एका आरोपीवर गुन्हा दाखल । लाचलुपचत विभागाची कारवाई

पाथर्डी । वीरभूमी - Jun 18, 2025 • 12:23 AM 1487 views
हॉटेल रात्री 10 नंतर सुरु असल्यामुळे तेथे गोंधळ असतो, यामुळे कारवाई करावी लागेल, असा पोलिसी धाक दाखवत फिल्मी स्टाईल अटकेतील आरोपीच्या माध्यमातून 1500 रुपये लाच स्विकारली. मात्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा सापळा असल्याचे लक्षात येताच लाचेची रक्कम दुसर्‍या एका पोलिसाकडे दिली. यावेळी दुसर्‍या पोलिसाने लाचेच्या रक्कमेसह पळून जावून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात दोन पोलिस कर्मचार्‍यासह पोस्को कायद्यातंर्गत अटक असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे दोनच दिवसापुर्वी पाथर्डी पोलिस ठाण्यात पोनि. विलास पुजारी यांनी पदभार स्विकारला असून या घटनेने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. लाच घेणार्‍या पोलिसांची नावे पोकॉ. लक्ष्मण सुखदेव पोटे (वय 35, रा. तारकेश्वर कॉलनी, पाथर्डी), पोना. रामदास जयराम सोनवणे (घोडेगाव, ता. नेवासा) व पोलिस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे (वय 22, रा. शिक्षक कॉलनी, माळीबाभूळगाव, पाथर्डी) अशी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी शहरालगत असलेले एक हॉटेल रात्री 10 नंतर चालू असते व त्यावर गोंधळ होतो म्हणुन कारवाई करावी लागेल. असे पोकॉ. लक्ष्मण सुखदेव पोटे यांनी सांगून हॉटेलवर कारवाई करायची नसेल तर मासिक दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असा हॉटेल मालकाला पोलिसी धाक दाखवल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर तक्रारदार यांचेकडून तडजोडीअंती 1500 रुपये हप्ता म्हणुन लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याचे मान्य केले होते.

त्यावरुन आज दि. 17 रोजी आरोपी लोकसेवक पोकॉ. लक्ष्मण पोटे यांच्याशी संपर्क केला असता ते पाथर्डी पोलिस ठाण्यातील पोस्को कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या वैद्यकिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पोटे याने तक्रारदार यांना उपजिल्हा रुग्णालयात बोलावून अटकेतील आरोपी राहुल शिवाजी साबळे याच्याशी चर्चा करुन त्याचेकडे लाचेची रक्कम 1500 रुपये देण्यास सांगितले. सदरची रक्कम ही लाचेची रक्कम माहिती असतांनाही ती घेण्यास नकार न देता साबळे याने ती स्विकारली व दुचाकीवरुन पोकॉ. पोटे याच्यासोबत पोलिस ठाण्याकडे जात असतांना रस्त्यावर चहा टपरीजवळ आरोपी लोकसेवक पोना. रामदास सोनवणे याचेकडे सुपूर्त केली.

दरम्यान लाचलुपचत पथकाचा सापळा लक्षात येताच पोना. सोनवणे याने लाचेची रक्कमेसह पळून जावून पुरावा नष्ट केला. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपी लोकसेवक पोकॉ. लक्ष्मण पोटे याला ताब्यात घेतले असून त्याचा मोबाईल व अटकेतील आरोपीचा शर्ट व पँट असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंक नाशिक विभागाचे पोलिस उपअधिक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोनि. आल्हाट, पोहेकॉ. दीपक पवार, पोकॉ. संजय ठाकरे, चापोना. परशुराम जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply