Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई

4 लाख 65 हजारांच्या अवैध दारुसह दोघे तर धारधार शस्त्रे बाळगणारे दोघे जेरबंद

पाथर्डी । वीरभूमी- Jun 30, 2025 • 10:16 PM 1776 views
मागील आठवड्यात अवैध मावा विक्री व सुगंधी तंबाखूसह अवैध धंद्यावर कारवाई केल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज सोमवारी पुन्हा धडक कारवाई करत 4 लाख 65 हजार रुपयांच्या अवैध विदेशी दारुसह दोघे तर धारधार शस्त्रे बाळगणारे दोघे असे चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने केली असून यामुळे अवैध धंदे चालवणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. या आदेशान्वये परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे दि. 30/06/2025 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पाथर्डी शहरातील एडके कॉलनी येथे काही इसम विनापरवाना विदेशी दारुचा साठा कब्जात बाळगून विक्री करत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकिगत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा, असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणार्‍या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी जाण्यासाठी रवाना झाले.

वरील नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी दोन इसम हे त्यांचे राहते घरातील तळमजल्यातील खोलीत विदेशी दारु कब्जात बाळगून विक्री करताना दिसले. सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी खोलीचे दरवाजामध्ये असलेले ग्राहक लोक तेथून पळून गेले. तर पथकाने काल्या उर्फ तौफीक निजाम शेख (वय 27 वर्षे, रा. जुनी पंचायत समिती रोड, पाथर्डी) व अल्ताफ रशीद शेख (वय 22 वर्षे, रा. इंदिरानगर, पाथर्डी) यांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती व घटना ठिकाणची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. याची किंमत सुमारे 4 लाख 65 हजार 120 रुपये असून हा सर्व मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे.

तसेच पाथर्डी शहरात भांडकर वाईन शॉपच्या पाठीमागे रॉयल स्टार पान टपरीमध्ये रंगनाथ दिलीप गायकवाड (रा. हंडाळ वस्ती, ता. पाथर्डी) व त्याचे सोबत इशान हारुन शेख (रा. कसबा पेठ, पाथर्डी) हे त्यांचे ताब्यात अवैधरित्या गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगुन असल्याची माहिती कळताच पथकाने छाबा टाकून प्लास्टीकची मुठ असलेले धारधार लोखंडी पाते असलेले दोन कोयत्यासह ताब्यात घेतले. तसेच रॉयल पान टपरीचे पाठीमागील जुने पंचायत समिती रोडला लागुन असलेल्या पत्र्याचे गोडाऊन मध्ये जावून झडती घेतली असता एक हिरव्या रंगाचे मावा तयार करण्याचे 30 हजार रुपये किंमतीचे लोखंडी मशिन पंचांसमक्ष ताब्यात घेवुन वरील दोघांना अटक केली आहे.

तसेच पाथर्डी शहरात मुख्य रस्त्यावर फिरुन बेशिस्त वाहन चालविणार्‍यांवर, काळ्या काचा असणारे वाहन तसचे नो पार्किंग मध्ये असणार्‍या वाहनाचे मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने अवैध धंदे चालवणार्‍यासह वाहन चालकांचे चांगलेच धाबे दाणाणले आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसई. राजेंद्र वाघ, सफौ. शकील शेख, पोहेकॉ. शंकर चौधरी, पोहेकॉ. अजय साठे, पोहेकॉ. अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ. दिगंबर कारखिले, पोहेकॉ. मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ. दिनेश मोरे, पोहेकॉ. उमेश खेडकर, पोहेकॉ. सुनिल पवार, पोकॉ. सुनिल दिघे, पोकॉ. अमोल कांबळे, पोकॉ. विजय ढाकणे, पोकॉ. दिपक जाधव, पोकॉ. जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply