Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव!

डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट

अहिल्यानगर । वीरभूमी- Jul 19, 2025 • 11:22 PM 1447 views
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथे येत्या दि. 12 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य अशा अध्यात्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन स्वतः परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराज करणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन प. पू. प्रदीप मिश्राजी महाराज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शिर्डी येथे होणार्‍या कथा महोत्सवाचे आमंत्रण दिले. भव्य शिवपुराण कथा महोत्सव दि. 12 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत होणार आहे.

शिवकथा महोत्सवाची संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेणार असून, या कार्यक्रमामागे एक हृदयस्पर्शी प्रेरणा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी व अहिल्यानगर परिसरातील माता-भगिनींनी सातत्याने विनंती केली होती की, शिवकथे सारखा अध्यात्मिक सोहळा आपल्या भूमीत व्हावा.

या भक्ती भावाला प्रतिसाद देत डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. या शिवकथा महोत्सवात 5 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, संपूर्ण परिसर भक्तिभावात नाव्हुन निघणार आहे.

शिवकथा केवळ श्रवणाचा सोहळा नाही, तर आत्मशुद्धी आणि जीवनाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या पावन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply