Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी

महिला आरक्षण सोडती जाहीर । महिला नेतृत्वासाठी नवे दार खुले

शेवगाव । वीरभूमी- Jul 23, 2025 • 09:43 PM 1010 views
शेवगाव तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार असून, बुधवार दि. 23 जुलै रोजी तहसील कार्यालयात महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. या सोडतीत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना सरपंचपदासाठी आरक्षण देण्यात आले. उर्वरित 46 ग्रामपंचायती सर्वसाधारण उमेदवारांसाठी खुल्या राहणार आहेत.

शेवगाव तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी 3.30 वाजता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही सोडत प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, नायब तहसीलदार गौरी कट्टे, श्रीकांत गोरे, राजेंद्र बकरे यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत पार पडली.

बैठकीच्या प्रारंभी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर महिला आरक्षण सोडत झाली. यामध्ये 94 ग्रामपंचायतींपैकी 48 ग्रामपंचायतीमध्ये महिलांना आरक्षण मिळाले आहे. यामुळे महिला नेतृत्वासाठी नवे दार खुले झाले आहे. आज निघालेल्या सोडतीमध्ये मागील आरक्षणात किरकोळ बदल झाला आहे. यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महिला आरक्षणाचे गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे : अनुसुचित जाती महिला आरक्षण : सालवडगाव, सोनेसांगवी, हसनापूर, दहिफळ जुने, कांबी. अनुसुचित जाती सर्वसाधारण : मंगरुळ खुर्द, सुलतानपूर बुद्रक, राणेगाव, थाटे, कोनोशी.

अनुसुचित जमाती महिला आरक्षण : सामनगाव, अनुसुचित जमाती सर्वसाधारण : ढोरजळगाव ने. इतर मागासवर्गीय महिला आरक्षण : खामपिंप्री नविन, मळेगाव शे, विजयपूर, लखमापूरी, नागलवाडी, निंबेनांदुर, ताजनापूर, चापडगाव, खरडगाव, वरुर बुद्रुक, आव्हाणे बुद्रुक, अधोडी, ठाकुर निमगाव. इतर मागासवर्गीय सर्वसाधारण : लाखेफळ, आखेगाव तितर्फा, बेलगाव, दहिगाव ने, लोळेगाव, तळणी, एरंडगाव समसुद, चेडेचांदगाव, खानापूर, सुलतानपूर खुर्द, शहरटाकळी, हातगाव.

सर्वसाधारण महिला आरक्षण : मंगरुळ बुद्रुक, गदेवाडी, गायकवाड जळगाव, शेकटे खुर्द, भाविनिमगाव, प्रभुवाडगाव, रांजणी, शेकटे बुद्रुक, बालमटाकळी, हिंगणगाव ने, सुकळी, ठाकुर पिंपळगाव, वरखेड, देवटाकळी, खुंटेफळ, ढोरसडे, वाडगाव, दहिगाव शे, लाडजळगाव, आखातवाडे, अमरापूर, अंतरवाली बुद्रुक, बक्तरपूर, अंतरवाली खुर्द, मडके, कोळगाव, खडके, एरंडगाव भागवत, ढोरजळगाव शे.

सर्वसाधारण जागा : माळेगाव ने, खामपिंप्री जुनी, आव्हाणे खुर्द, बर्‍हाणपूर, भगूर, भातकुडगाव, बोधेगाव, बोडखे, दादेगाव, वाघोली, दिवटे, गोळेगाव, जोहरापूर, क-हेटाकळी, खामगाव, मजलेशहर, मुंगी, नजिक बाभुळगाव, पिंगेवाडी, शिंगोरी, दहिफळ नविन, कुरुडगाव, वडुले बुद्रुक, वडुले खुर्द, राक्षी, भायगाव, घोटण, सोनविहीर.

काही महिण्यापुर्वी काढण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर रद्द करुन नव्याने आरक्षण सोडत करण्यात आली. या सोडतीमध्ये काही ग्रामपंचायतीमध्ये बदल झाला असून इतर ग्रामपंचायतमध्ये पुर्वीचेच आरक्षण कायम राहीले आहे. यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती पहायला मिळाली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply