Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र

31 वर्षांच्या वाद येणार संपुष्टात । शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही समाजांची एकात्मता । प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

पाथर्डी । वीरभूमी - Aug 02, 2025 • 07:53 AM 1536 views
तालुक्यातील माणिकदौंडी गावात गेल्या 31 वर्षांपासून वादामुळे बंद असलेली बलखंडी बाबांच्या मंदिरातील पूजा पुन्हा सुरू करण्यासाठी हिंदू आणि मुस्लीम समाज एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन्ही समाजाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत शांततेच्या वातावरणात परंपरागत पद्धतीने पुजा सुरु करण्यास अनुमती मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देत कायद्याच्या चौकटीत राहून सर्वतोपरी मदत केली जाईल, मात्र कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस निरीक्षक पुजारी यांनी दिला.

बलखंडी बाबांच्या मंदिरात परंपरेनुसार लोंढे कुटुंब बासरी वाजवते, आठरे कुटुंब चादर चढवते, तर पठाण कुटुंब दिवा लावणे आणि नगारा वाजवण्याचा मान पार पाडते. याशिवाय गणपतीच्या मिरवणुकीतही पठाण कुटुंब सहभागी असते आणि मोहरमच्या ताबुताला हिंदू समाजातील शंकर काका कुलकर्णी खांदा देतात. पंढरपूरच्या वारीसाठी दोन्ही समाजातील लोक जात असत. ही परंपरा गावात गुण्यागोविंदाने नांदत होती. मात्र काही दशकांपूर्वी वाद निर्माण होऊन पूजेला अडथळा निर्माण झाला आणि हा वाद न्यायालयात गेला. सुदैवाने आता दोन्ही समाजांनी सामंजस्याने पुढे येत वाद मिटवण्याचा निर्धार केला आहे.

या शांतता समितीच्या बैठकीत आदिनाथ महाराज आंधळे, नवनाथ चव्हाण, पोपट तोडकर, संपत गायकवाड, पोपटभाई पठाण, समीर पठाण, जलाल पठाण, शायद पठाण, पो.उपनिरीक्षक लक्ष्मणराव पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुहास गायकवाड, ग्रामसेवक सचिन दळवी, धनराज चाळक, रमीज पठाण, बाळासाहेब कांबळे, मिठु शेळके, वसंतराव वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदू-मुस्लीम असा वाद करू नका. सर्वप्रथम आपण माणूस आहोत. चांगले कर्म करा, चांगलेच होईल. देव कोणाचाही नसतो, तो सर्वांचा असतो. मंदिरासमोर भेदभाव नको, असा दिलासा देतानाच पोलिस निरीक्षक पुजारी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गावात शांतता राखली तर प्रशासन तुमच्या पाठीशी असेल; पण गुंडगिरी करणार्‍यांना आवर घालण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

बैठकीचे प्रस्ताविक आदिनाथ महाराज आंधळे यांनी केले तर वसंतराव वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण माणिकदौंडी गावाने दिलेली एकतेची ग्वाही ही सामाजिक सलोख्याचे आदर्श उदाहरण ठरत आहे.

माणिकदौंडी गावात नव्या उमेदीनं एकतेचं पहाट उगवत आहे. बलखंडी बाबांची पूजा, परंपरा आणि धार्मिक सौहार्द पुन्हा खुलवण्यासाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरेल, यात शंका नाही. अशा कृतीमुळे गावच नव्हे, तर संपूर्ण तालुका प्रेरित होईल.

*ग्रामस्थांची एकजूट*- ग्रामस्थांनी यावेळी वाद मिटवण्यासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले. किरकोळ वादाला धर्माचा रंग न देता, दोन्ही समाजांनी एकत्रित पूजा सुरू करावी, असे ठरवले गेले. तसेच मंदिरात झालेली पडझड दुरुस्त करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंतीही करण्यात आली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply