Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल

पाथर्डी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण । पाच जणांवर गुन्हा दाखल

पाथर्डी । वीरभूमी- Aug 07, 2025 • 09:57 PM 5624 views
पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार करणारा वासनांध प्राथमिक शिक्षक व प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकणार्‍या चार जणांवर अखेर पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘उडाण’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पिडीत मुलीच्या आई-वडीलांचे समुपदेशन केले. त्यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात नराधम शिक्षकासह प्रकरण मिटवणार्‍या चार अशा पाच जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे वासनांध प्राथमिक शिक्षक संजय उत्तम फुंदे (रा. पाथर्डी) नाव असून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकणार्‍या आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सुर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण, उमर नियाज पठाण (चौघे रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी) अशी आहेत.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. 1 ऑगस्ट 2025 घडली. मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आईला सर्व घटना सांगितली. फुंदे सर एक महिण्यापासून दुपारच्या सुट्टीमध्ये सर्व मुले बाहेर गेल्यावर एकटीला वर्गामध्ये बोलावून मांडीवर बसवून सर्व अंगावर हात फिरवून चिमटे काढतात. तसे करु न दिल्यावर गालावर, पाठीवर चापटी मारतात. यामुळे मी शाळेत जाणार नाही सांगत रडत होती. तिला विश्वासात घेवून सर्व प्रकार विचारल्यानंतर तिने सर्व घटना सांगितली.

दुसर्‍या दिवशी शिक्षक संजय फुंदे यांना जाब विचारायला गेल्यानंतर शिक्षक फुंदे याने पिडीत आईवडीलांची माफी मागत चूक झाली, पुन्हा असे होणार नाही. असे म्हणुन माफी मागितली. त्यावर गावातील आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सुर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण, उमर नियाज पठाण यांनी मध्यस्थी करत तुम्हाला गावात रहायचे आहे. पुन्हा त्रास नको होयला असे म्हणाले. त्यावेळी पिडीत मुलीचे आईवडील घरी आले. त्यानंतर शिक्षक फुंदे याच्या भितीने पिडीत मुलगी शाळेत गेली नाही.

झालेल्या प्रकाराची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी ‘उडान’ संस्थेला घडलेली घटना कळविली. त्यानंतर उडाण संस्थेचे कार्यकर्ते गुरुवारी पाथर्डीत दाखल होत पोलिसांबरोबर पिडीत मुलीच्या घरी जावून त्यांचे समुपदेशन केल्यानंतर मुलीच्या आईने पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शिक्षण विभाग आणि समाजव्यवस्थेला काळिमा फासणार्‍या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत गुन्हा दाखल होवू नये म्हणुन सामाजिक कार्यकर्त्यांसह पिडीत मुलीच्या आईवडीलांवर दबाव आणला गेला मात्र कोणताही दबाव न जुमनता अल्पवयीन मुलीच्या न्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply