Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

वर्गातीलच दोघांनी केला हल्ला । घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

पाथर्डी । वीरभूमी- Aug 07, 2025 • 11:23 PM 2560 views
शहरातील इयत्ता आठवीत शिकणार्‍या वेदांत दत्तात्रय कुलट (वय 14 वर्षे) या विद्यार्थ्यांवर वीर सावरकर मैदान परिसरात गुरुवारी भर दुपारी त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून संपूर्ण पालक वर्गामध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेदांत याच्या पाठीवर धारदार चाकूने गंभीर इजा झाली आहे. पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वेदांत हा शहरातील एका विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेतो. परीक्षेचा पेपर देऊन तो दुपारी दीडच्या सुमारास शाळेतून घरी आला. त्यानंतर खासगी कामानिमित्त तो दुचाकीवरून शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गेला. याच दरम्यान त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्याला गाठले.

किरकोळ वादातून एका मित्राने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हल्ला झाल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. स्थानिकांनी वेदांतला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंड व संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलीस अधिक तपास करत असून, दोन्ही संशयित विद्यार्थ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.विद्यार्थी दक्षेत मुले असे कृत्य करत असल्याने सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. या वयात मुलांकडे चाकुसारखे घातक शस्त्र येतात कसे, खेळण्या बागडण्याच्या व अभ्यास करण्याच्या वयात हिंसक विचार डोक्यात कसे घुसतात. यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply