Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी

वायरमनला शेतकर्‍याकडून 2500 रुपये घेतांना रंगेहात पकडले

पाथर्डी । वीरभूमी- Aug 17, 2025 • 11:33 PM 2279 views
पाथर्डी तालुक्यातील राघो हिवरे येथील शेतकर्‍याला सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाच मागणार्‍या वायरमनला अहिल्यानगर लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. अटक केलेल्या वायरमनचे नाव राजेंद्र दादासाहेब कराळे (वय 41, धंदा-नोकरी, बाह्यस्त्रोत वायरमन, म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित करंजी कक्ष, ता. पाथर्डी) असे असून त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शासनाच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पंप मंजूर झाला होता. हा पंप बसविण्यासाठी आरोपी वायरमन राजेंद्र कराळे हे शेतात आले. पाहणी करून त्यांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे घेतली आणि ते म्हणाले की, सौर पंप बसवायच्या ठिकाणी विद्युत खांब असल्याने तुमचा अर्ज नामंजूर होऊ शकतो, मंजुरी हवी असेल तर चार हजार रुपये द्यावे लागतील.

या धमकीमुळे तक्रारदाराने नाईलाजास्तव वायरमन कराळे याला 2000 रुपये रोख दिले. त्यानंतर कराळे यांनी उर्वरित रक्कम पंप बसवल्यानंतर द्यावी, असे सांगितले. नंतर पंपाचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी पुन्हा उर्वरीत रकमेची मागणी केली. यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या शेतातील पंप बसवणीच्या कामाच्या मोबदल्यासाठी 2000 रुपये आणि राहत्या घराच्या वीजमीटरला सिंगल फेज कनेक्शन जोडण्यासाठी 500 रुपये अशी एकूण 2500 रुपयेची मागणी केली. तक्रारीनंतर अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाने प्राथमिक पडताळणी केली. दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी पंचांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. आरोपी कराळे यांनी तक्रारदाराकडून प्रत्यक्षात 2500 रुपये लाच स्वीकारल्याचे उघड होताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

ही यशस्वी सापळा कारवाई पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी पर्यवेक्षण केले. पथकात पो.ना. उमेश मोरे, चंद्रकांत काळे, पो.कॉ. गजानन गायकवाड, शेखर वाघ आणि चालक हे.कॉ. हारूण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संपूर्ण मोहिमेला नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे व अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने आवाहन करण्यात आले की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती शासकीय कामाकरिता लाच मागत असल्यास नागरिकांनी तातडीने विभागाशी संपर्क साधावा.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply