Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट

सहा मंडळांच्या अध्यक्षांसह सहा डिजे मालकांवर गुन्हे दाखल

शेवगाव । वीरभूमी Sep 05, 2025 • 03:56 PM 1704 views
शेवगाव शहरातील आंबेडकर चौक येथे गुरुवार दि. 4 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे सिस्टीमवर कर्णकर्कश आवाज करीत मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी शहरातील 6 मंडळाच्या अध्यक्षांसह 6 डिजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश बबन वखरे (रा. शेवगाव) व डिजे वाहन क्रमांक एम. एच. 12, सीटी 9216 चे मालक. जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शरद जाधव (रा. शेवगाव) व डिजे वाहन क्रमांक एमएच 04, ए इ 5590 चे मालक, स्पंदन ग्रुपचे अध्यक्ष ऋषिकेश श्यामराव वाघिरे (रा. शेवगाव) व डीजे वाहन क्रमांक एम एच 10, झेड 1846 चे मालक, द्रोणाज ग्रुपचे अध्यक्ष गोविंद लक्ष्मण लांडे (रा. शेवगाव) व डीजे वाहन क्रमांक एम एच 04, बी झेड 90 50 चे मालक. समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा दगडू धनवडे (रा. शेवगाव) आणि डीजे आयशर गाडी (क्र. एमएच-14 एएच 2349) मालक आणि पवाज ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण अरुण भारस्कर (रा. शेवगाव) व डीजे वाहन क्रमांक एम एच 16, एई 17 39 चे मालक अशा 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ७ ते १० वाजेदरम्यान घडली. यावेळी मिरवणुक काढणार्या मंडळाच्या अध्यक्षांना बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्यांनी आवाज कमी करण्याच्या वारंवार सूचना दिल्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जोरदार गाणी वाजवून आवेशपूर्ण घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादांचे उल्लंघन झाले.

या प्रकरणी वेगवेगळ्या बंदोबस्तावरील सहा पोलीस कॉन्स्टेबल यांनी फिर्याद दिल्यानुसार, वरील 12 जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३, १५ व ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० चे कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व PSI बाजीराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित डीजे वाहनांसह मंडळांच्या अध्यांवर गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply