Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची वाट न पाहाता तरुणांनी राबविले रेस्क्यू आपरेशन

पाथर्डी । वीरभूमी - Sep 15, 2025 • 11:55 AM 2311 views
तालुक्यातील करंजी, वृद्धेश्वर, मढी डोंगररांगामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अचानक नदीला पूर आल्याने अनेक घरामध्ये पाणी शिरले. अनेक घरांना पाण्याने वेढले आहे. करंजी येथील 11 जणांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने तर कासार पिंपळगाव येथील मधला मळा परिसराला पाण्याने वेढल्याने अडकलेल्या सुमारे 30 जणांना गावातील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत सुरक्षित बाहेर काढले. नदीकाठच्या अनेक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचा कांदा, घरातील धान्य, संसार उपयोगी वस्तू भिजल्या आहेत. जनावरे मृत्यूमुखी पडली तर काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहुन गेली आहेत. अद्यापही डोंगररांगा परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने नदी पात्रातील पाणीपातळी कमी जादा होत असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगाच्या करंजी, मढी, वृद्धेश्वर, घाटशिरस परिसरात रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानंतर सोमवारी पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. करंजी येथे उत्तरेश्वर मंदिर परिसरातील घरामध्ये पाणी शिरले. अनेक दुकांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. तिसगाव, मढी, निवडूंगेसह नदीकाठच्या वस्त्यांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. करंजी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 11 जणांना आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने सुरक्षित बाहेर काढले.

कासार पिंपळगाव येथील नदी काठच्या अनेक घरांत पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाला. चाळीमध्ये टाकलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजला आहे. अचानक पाणी आल्याने अनेक शेतकर्‍यांच्या गायी व इतर जनावरे वाहुन गेले तर काही जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत.

कासार पिंपळगाव येथील मधला मळा परिसराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने तेथील रहीवासी अडकून पडले होते. आ. मोनिकाताई राजळे यांनी तातडीने प्रशासनाला मदतीच्या सुचना दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला माहिती दिल्यानंतर पथक मदतीसाठी निघाले मात्र करंजी, तिसगाव येथील नद्यांना पूर आल्याने मदत मिळू शकली नाही. सरपंच मोनाली राजळे यांनी घटनास्थळी धाव घेत आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी तरुणांना सुचना दिल्या. गावातील सुमारे 40 ते 50 तरुणांनी दोरखंड, जेसीबीच्या साह्याने आपत्तीग्रस्त कुटुंबापर्यंत जावून सुमारे 30 जणांना सुरक्षित बाहेर काढले.

यावेळी तरुणांबरोबर स्वतः ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, मंडळाधिकारी कटारनवरे हे आपत्ती कुटुंबापर्यंत पोहचले. गावातील तरुणांनी कोणतीही तमा न बाळगता मधला मळा परिसरातील सुमारे 30 जणांना सुरक्षितस्थळी आणले. पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने आपत्तीग्रस्तांच्या मदतीत अडचणी येत होत्या. गावातीलच भिल्ल समाज बांधवांनी तराफा तयार करुन तर गावातील तरुणांनी दोरखंड व जेसीबीच्या साह्याने मोठी मदत केली.

करंजी, तिसगाव परिसतात पुर परिस्थिती असल्याने कासार पिंपळगाव पर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची मदत मिळू शकली नाही. मात्र गावातील तरुणांनी जिद्दीने अडकलेल्या कुटुंबांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले, याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने वेळोवेळी सतर्कतेच्या सुचना देण्यात येत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply