Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कासार पिंपळगावातील बंधार्‍यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला

अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल । महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन

पाथर्डी । वीरभूमी - Mar 28, 2026 • 03:29 PM 168 views
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील मुळा पाटबंधारेच्या चारी खाली असलेल्या बंधार्‍यातील पाण्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवार दि. 27 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघड झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सदरील मृतदेह ताब्यात घेत पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) व 238 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीजवळ असलेल्या बंधार्‍यातील पाण्यात गोणीमध्ये काहीतरी तरंगत असल्याचे आढळून आले. सध्या मुळा कॅनॉलला पाणी असल्यामुळे या पाण्याने बंधारा भरलेला आहे. बंधार्‍यालगत ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहिर आहे. याच विहिरीतून गावाला पिण्याचे पाणी पुरविले जाते. सुरुवातीला त्या गोणीत मृत जनावर असावे असा संशय ग्रामस्थांना आला. पाणी दूषित होऊ नये म्हणुन काही ग्रामस्थांनी ती गोणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गोणी काढतांना फाटल्याने त्यातून मानवी पाय बाहेर आल्याने गोणीमध्ये मृत जनावर नसून मृतदेह असल्याचे समजताच पाथर्डी पोलिस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली.

घटनेचे गांभिर्य ओळखून पो.नि. विलास पुजारी यांनी स्वतः पथकासह येत पहाणी केली. मृतदेह असलेली गोणी बंधार्‍यातील पाण्यात तरंग असतांना पाहुन जेसीबीच्या साह्याने व ग्रामस्थांच्या मदतीने गोणी पाण्याबाहेर काढण्यात आली. यावेळी फॉरेन्सिक व श्वान पथकाने घटनास्थळी तपासणी केली.

मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो उत्तरीय तपासणीसाठी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार गोणीत बांधलेला मृतदेह हा महिलेचा असून अंदाजे 55 ते 60 वर्षे वायोगटातील असून तिचा रंग गोरा, उंची सुमारे 160 सेंमी आहे. तिचे केस काळे-पांढरे असून हातात चॉकलेटी-सोनेरी रंगाच्या काचेच्या बांगड्या, गळ्यात काळ्या-पिवळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे. उजव्या हातावर ‘पाच आसरा’ असे गोंदलेले असून अंगावर काळा ब्लाऊज व जांभळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केलेली आहे. मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल जवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) व 238 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी करत असून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अनोळखी महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात नागरिकांनी पुढाकार घेत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संबंधित महिलेबाबत किंवा आरोपीबाबत काही माहिती असल्यास तात्काळ पाथर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply