Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

त्या मृतदेहाबाबत पोलिसांची महत्वाची माहिती

पोलिसांच्या तपासाला वेग । खुन्यापर्यंत पोहचण्यासाठी विविध पथके रवाना

पाथर्डी । वीरभूमी- Mar 29, 2026 • 12:53 AM 1136 views
शुक्रवार दि. 27 रोजी कासार पिंपळगाव येथील बंधार्‍याच्या पाण्यात गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला होता. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी हालचाली वाढविल्या असून नागापूर एमआयडीसी व शनि शिंगणापूर येथील दोघांनी पाथर्डी पोलिसांशी संपर्क केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली.

कासार पिंपळगाव येथील बंधार्‍यात गोणीत बांधलेला अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी वेग घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात मृत महिलेचे वर्णन पाठवून या वर्णनाचे कोणी मिसींग आहे का? याचा शोध घेतला असता नागापूर एमआयडीसी येथील एका जणाने मिळते-जुळते वर्णन असल्याचे सांगितले. मात्र साडीचा रंग मॅच होत नसल्याचे पोलिसांना सांगितले.

तर नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथील वरील मयताचे वर्णनाला मिळते जुळती महिला दोन वर्षापासून बेपत्ता असल्याचे समजले. यानुसार तेथील नातेवाईक चौकशीसाठी शनिवारी रात्री उशिरा येणार असल्याची माहिती पोनि. विलास पुजारी यांनी दिली.

मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू असून ओळख पटल्यानंतरच महिलेच्या खुनाचा उलगडा होणार आहे. यामुळे मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र दुसर्‍या दिवशीही ओळख पटली नाही. पोलिसांनी तपासाला वेग दिला असून तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करुन ती ठिकठिकाणी पाठविण्यात आली आहेत.

मयत महिला ही सुमारे 55 ते 60 वर्षे वायोगटातील असून तिचा रंग गोरा, उंची सुमारे 160 सेंमी आहे. तिचे केस काळे-पांढरे असून हातात चॉकलेटी-सोनेरी रंगाच्या काचेच्या बांगड्या, गळ्यात काळ्या-पिवळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे. उजव्या हातावर ‘पाच आसरा’ असे गोंदलेले असून अंगावर काळा ब्लाऊज व जांभळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केलेली आहे, तरी कोणाला याबाबत काही माहिती असल्यास तातडीने पाथर्डी पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन पोनि. विलास पुजारी यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply