शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील । शेवगाव येथे टंचाई आढावा बैठक । ताजनापूर टप्पा-3 साठी 500 कोटींची घोषणा
शेवगाव तालुक्याला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना राबविण्यात येईल. शेवगावचे हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत अन्यत्र वळविले जाणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ताजनापूर टप्पा क्रमांक तीनसाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यापूर्वी सर्वेक्षणासाठी जलसंपदा विभागाने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची घोषणाही त्यांनी केली.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 2) शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात विशेष आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विखे पाटील यांनी अधिकार्यांना दुष्काळी परिस्थितीत निष्काळजीपणा न करता युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. जनतेला दिलासा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी तत्परता दाखवावी. कोणत्याही अधिकार्याने मुख्यालय सोडू नये; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पुरवठा होणार्या पाण्यावर फिल्टर प्रक्रिया करून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी पाणी व चारा उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
पाथर्डी तालुक्यातील 137 गावांपैकी 53 गावांमध्ये सध्या 68 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती तहसीलदार उद्धव नाईक यांनी दिली. आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव-पाथर्डी तालुक्यात सध्या 82 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आगामी काळात टंचाई आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
ताजनापूर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना गती देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ताजनापूर टप्पा क्रमांक एकमधील आठ गावांना पाणीपुरवठ्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक दोनमधून 13 गावांना शेतीसाठी पाणी देण्याचा मानस आहे. या 13 गावांसाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
ताजनापूर प्रकल्पाबाबत संभ्रम निर्माण करण्याचे काम झाले. त्यामुळे टप्पा क्रमांक तीन उभारण्याचा जलसंपदा मंत्र्यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा असून, हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षाही राजळे यांनी व्यक्त केली.
शेवगावचे हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत अन्यत्र वळविले जाणार नाही, असे स्पष्ट करत विखे पाटील म्हणाले, मी स्वतः जलसंपदा मंत्री असूनही शेवगावकरांचा माझ्यावर विश्वास नाही का? शेवगाव तालुक्याला त्याचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. बैठकीत जलजीवन मिशनच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निकृष्ट अथवा बोगस कामे आढळल्यास संबंधित ठेकेदारांकडून वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा योजनांच्या पाइपलाइनची तोडफोड करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले.
आमदार मोनिका राजळे यांनी पशुधनाची नोंद झालेली नसल्याने तातडीने पशुगणना करून त्याचा आढावा घेण्याची मागणी केली. परिस्थिती बिकट असून, त्यावर उपाययोजनांसाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेवगावचे हक्काचे पाणी पाथर्डीला पळविले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळामुळे ऊस, फळबागा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ व सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या.
बैठकीत शेतकरी व ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी, शेततळे आणि बंधार्यांतील गाळ काढणे, तसेच जायकवाडी धरणातून शेवगाव व पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागाला शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागण्या केल्या. ग्रामसेवक व तलाठी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी मांडल्या. विविध प्रश्नांवरून बैठकीत काहीवेळा तीव्र चर्चा व खडाजंगी झाली.
या बैठकीस विनायक देशमुख, अरुण मुंडे, महेश फलके, संजय टाकळकर, संतोष केसभट, धनंजय बडे, ताजनापूर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, मुख्य अभियंता गणेश हासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, उपजिल्हाधिकारी हिंगे, जलसंपदा विभागाच्या सुनंदा जगताप, सायली पाटील, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी महेश दहिफळे, धस, उपअभियंता कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, मुख्याधिकारी संतोष लांडगे, विजया घाडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केले.