Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मंदिर उघडण्यासाठी मढी येथे भाजपाचे घंटानाद आंदोलन

मंदिर उघडण्यासाठी मढी येथे भाजपाचे घंटानाद आंदोलन

पाथर्डी । वीरभूमी - Oct 13, 2020 • 12:00 AM 1374 views
मंदिर बंद सुरू बार उद्धवा अजब तुझे सरकार, प्रार्थनास्थळे खुली झालीच पाहिजे, मंदिरे बंद ठेवणाऱ्या तसेच भक्तांच्या धार्मिक भावनेशी खेळणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ मंदिराच्या प्रवेशव्दारावर घंटानाद आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जि. प. सदस्य राहुल राजळे यांनी केले. आंदोलनात जि.प.सदस्य पुरुषोत्तम आठरे,माजी जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनिल परदेशी, माजी सभापती काकासाहेब शिंदे, भाजपाचे तालुका सरचिटणीस जे. बी. वांढेकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, उपसरपंच रविंद्र आरोळे, भगवान मरकड, बबन मरकड, करोडीचे सरपंच महेश अंगारखे, राजेंद्र साप्ते, भाऊसाहेब पाखरे आदि सहभागी झाले होते.

दुपारी बारा वाजता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री क्षेत्र मढी देवस्थान येथे मंदिराच्या प्रवेशव्दारावर एकत्र जमले त्यानंतर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत घंटानाद करून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जि.प.सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दुपारी एक वाजता तहसिलदारांच्या नावे असलेले निवेदन तलाठी तथा ग्रामअधिकारी पल्लवी बऱ्हाटे यांना देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply