Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लांडग्यांच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

मढेवडगाव येथील घटना । शेतकर्‍यांचे 35 हजार रुपयाचे नुकसान

श्रीगोंदा । वीरभूमी - Oct 29, 2020 • 12:00 AM 1947 views
तालुक्यातील मढेवडगाव येथील देवमळा वस्तीवर बुधवार दि. 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्यांच्या टोळीने बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून दोन शेळ्या जाग्यावर फस्त केल्या. एक शेळी मारून टाकली तर एक बोकड लंपास केला. या हल्ल्यात चार शेतकर्‍यांचे सुमारे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 28 व दि. 29 च्या मध्यरात्री दरम्यान अंदाजे सहा ते सात लांडग्यांनी मढेवडगाव येथील वनविभागाच्या जंगला नजीक असलेल्या देवमळा (मांडे वस्ती) वर मोर्चा वळवला व दारात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात लांडग्यांनी दोन शेळ्या जाग्यावरच खाऊन फस्त केल्या.

एक शेळी मारून टाकली तर एका बोकडाचा काही भाग सोडता बोकड घेऊन पोबारा केला. मारुती रंगनाथ मांडे, महादेव गंगाराम कांबळे, नाना नातू कांबळे व सोपान किसन मांडे यांची प्रत्येकी एक शेळी यात बळी पडली. एकूण 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्यावर वनपाल मच्छिंद्र गुंजाळ व वनरक्षक नितीन डफडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचनामा केला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply