Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

भय इथले संपत नाही

गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता शिरापूर येथून पाच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलले

पाथर्डी । वीरभूमी - Oct 29, 2020 • 12:00 AM 37768 views
पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी नंतर आता शिरापूर येथील डोंगराच्या पायथ्याला राहणार्‍या संजय मुरलीधर बुधवंत यांच्या पाच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगाच्या परिसरात मढी, वृद्धेश्वर, शिरापूर, केळवंडी, माणिकदौंडी आदी परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. मागील आठवड्यात मढी येथून एक व त्यानंतर केळवंडी येथून एक असे दोन बालकांना बिबट्याने उचलून नेहुन ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यानंतर आज गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शिरापूर गाव हद्दीतील डोंगराच्या पायथ्याला राहणार्‍या संजय मुरलीधर बुधवंत यांची पत्नी आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेवून पडवीत बसली होती. त्याच दरम्यान बिबट्याने झेप घेवून आईच्या मांडीवर असलेल्या पाच वर्षाच्या मुलाला उचलून नेले.

अवपल्या डोळ्यासमक्ष मुलाला बिबट्या घेवून जात असल्याचे पाहुन आईने बिबट्याला झुंज दिली. मुलाला पकडतांना बिबट्याची शेपटीच हातात आली. तरीही बिबट्याने झटका देऊन बाळाला घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला.

या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध सुरू केली आहे. वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून शोध सुरू आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी व त्यांच्या उपाय योजना कमी पडत असल्याने बिबट्याला पकडण्यात अपयश येत आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply