Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

प्रकल्पबाधित व परिसरातील शेतकर्‍यांच्या तक्रारी येवू देवू नका

आ. आशुतोष काळेंनी समृद्धीच्या उपाध्यक्षांना दिली समज

कोपरगाव । वीरभूमी - Nov 26, 2020 • 12:00 AM 726 views
कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचे होत असलेले नुकसान व खराब झालेल्या रस्ते दुरुस्तीकडे समृद्धी महामार्ग व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ज्या ज्या गावात समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे त्या गावातील ग्रामस्थांनी व प्रकल्पाबाधित शेतकर्‍यांनी दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. प्रकल्पाबाधित शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणींची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी गायत्री प्रोजेक्टस कंपनीचे उपाध्यक्ष के. एस. रेड्डी यांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बोलावून घेवून यापुढे प्रकल्पबाधित व परिसरातील शेतकर्‍यांच्या तक्रारी येवू देवू नका अशी समज दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरु आहे त्या परिसरातील रस्त्यांची वाट लागली आहे. समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतांना ज्या रस्त्यांचा वापर होणार आहे. त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीला बंधनकारक आहे. तरीही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून समृद्धी महामार्गाचे काम सुरूच होते. त्याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या तक्रारीचा पाढा वाचला होता.

मुख्य रस्ते व गावातील इतर रस्त्यावरून गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीचे अवजड वाहने जात असल्यामुळे आज या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले असून सर्वत्र प्रचंड धूळ असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा अनेक तक्रारी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे शेतकर्‍यांनी मांडल्या होत्या. त्याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीचे उपाध्यक्ष रेड्डी यांना समज दिली होती.

तसेच आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच एम. एस. आर. डी. सी. चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार यांची भेट घेतली. खराब झालेल्या रस्त्यांच्या समस्येत लक्ष घालून खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याबाबत गायत्री प्रोजेक्टस कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी केली. याप्रसंगी एम. एस.आर.डी. सी. चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार, अधिक्षक अभियंता निघोट, प्रांत-विठ्ठल सोनवणे, गायत्री प्रोजेक्टस कंपनीचे उपाध्यक्ष के. एस. रेड्डी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, चारुदत्त सिनगर, रोहिदास होन आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply