Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेतकरी कामगारांच्या मागण्यांसाठी अकोलेत माकपचा भव्य मोर्चा

शेतकरी कामगारांच्या मागण्यांसाठी अकोलेत माकपचा भव्य मोर्चा

अकोले । वीरभूमी - Nov 26, 2020 • 12:00 AM 854 views
शेतकरी व कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर अकोले येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकरी कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. वसंत मार्केट येथील पक्षाच्या कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातून फिरून अकोले तहसील कार्यालयावर नेण्यात आला.

अकोले तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसानीची भरपाई सर्व शेतकर्‍यांना द्या, भेदभाव न करता सर्व आदिवासींना खावटी अनुदान द्या, आशा, अंगणवाडी, अर्धवेळ परिचर, आहार कर्मचार्‍यांना किमान 15 हजार रुपये वेतन द्या. बांधकाम कामगारांना विविध योजनांचे लाभ द्या, निराधार, विधवा, परित्यक्ता, अपंगांना तातडीने देय असलेले मानधन द्या. केंद्राचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. वन जमिनी कसनारांच्या नावे करा. कामगार विरोधी कायदे मागे घ्या, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

परतीच्या पावसाने तालुक्यातील सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झालेले असताना केवळ मोजक्याच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांवर यामुळे अन्याय झाला आहे. खावटी अनुदानातही निकष लावून तालुक्यातील हजारो गरीब आदिवासींना वंचित ठेवण्यात आले आहे. निराधार विधवांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून थकविण्यात आले आहे. मोर्चात याबाबत संताप व्यक्त करण्यात आला असून हे प्रश्न पुढील एक महिन्यात न सोडविल्यास तालुक्यात अत्यंत आक्रमक आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड, तुळशीराम कातोरे, आशा घोलप, भारती गायकवाड, छाया कुलधरण, अस्मिता कोते, सविता काळे, नंदू गावंडे, अविनाश धुमाळ, संदीप शिंदे आदींनी केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply