Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

ग्रामसेवकाच्या मनमानीविरोधात मनसे कार्यकर्त्याचे उपोषण

जातेगाव ग्रामपंचायतीसमोर उपोषण । लेखी अश्वासनानंतर उपोषण मागे

जामखेड । वीरभूमी - Nov 26, 2020 • 12:00 AM 1178 views
तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुशील शेळके यांच्या मनमानी कारभाराला वैतागून मनसेचे शाखा अध्यक्ष आरकेश गायकवाड यांनी जातेगाव येथील ग्रामपंचायती समोर अमरण उपोषण सुरू केले होते. अखेर विस्तार अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषणकर्ते आरकेश गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ग्रामसेवक शेळके हे कार्यालयात सतत गैरहजर असतात. 14 व्या वित्त आयोगातून गटार व स्मशानभूमीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. दलित वस्तीतील अनेक बोगस कामे केली आहेत. पाणीपुरवठाकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील पोलवरील बल्प बंद पडले आहेत ते बसवलेले नाहीत. प्रत्येक शौचालय धारकाकडून तीन हजार रुपये घेतले असल्याचाही आरोप जातेगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीचा उतारा काढण्यासाठी तीनशे रुपये पावती न देता घेणे, जागेच्या खरेदीखताची नोंद न लावणे, माहितीच्या अधिकाराचे कागदपत्र न देणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत.

ग्रामस्थांनी देखील या तक्रारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. के. माने यांच्यासमोर उपोषण स्थळी मांडल्या होत्या. हे ऐकून अधिकारीही अचंबीत झाले होते. ग्रामसेवकावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका मनसेचे कार्यकर्ते यांनी घेतली होती. परंतु विस्ताराधिकारी माने यांनी उपोषणकर्त्यांना याबाबत सखोल चौकशी करून ग्रामसेवकावर पंधरा दिवसात कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष युवराज ढेरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव जामकावळे, मनसेचे जामखेड तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, सनी सदाफुले, नाना गायकवाड, पोपट गायकवाड, जातेगावचे शाखा उपध्यक्ष शंकर भोसले, शाखा उपध्यक्ष घनशाम देशमाने, शाखा सचिव राहुल पौळ, मा. सरपंच नानासाहेब गायकवाड, रेवणनाथ गायकवाड, संजू गायकवाड, बबन गिरी, अशोक गायकवाड, गणेश गायकवाड, शंकर भोसले, राहुल पौळ, वैशिष्ट गायकवाड, दादा गायकवाड, कल्याण गायकवाड, शिवप्रसाद गोसावी, रवी गायकवाड, अनिकेत चव्हाण, राकेश गायकवाड, बापू गायकवाड, गणेश पोळ, हरिष गायकवाड, निरंजन पवर, गौरव पोपले, बालाजी गोसावी, बालाजी काळे, विनोद गायकवाड, शुभम माने, पंकज दिक्षितसह मनसे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply