Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

बिबट्याच्या भितीमुळे शेती पंपाचा वीजपुरवठा दिवसा करावा ः स्वप्नील खाडे यांची मागणी

बिबट्याच्या भितीमुळे शेती पंपाचा वीजपुरवठा दिवसा करावा ः स्वप्नील खाडे यांची मागणी

अहमदनगर । वीरभूमी - Nov 26, 2020 • 12:00 AM 1308 views
ग्रामीण भागातील, शेतातील शेतीपंपासाठी लागणारी विद्युत लाईट रात्री सोडली जाते. शेतकर्‍यांना आपला जीव मुठीत धरून कुठलीही सुरक्षितता नसताना विंचू - काट्याची, सर्पाची कसलीही परवा न करता त्याचे पीक जाऊ नये, म्हणून जीवाचे रान करावे लागते. रात्रीचा वीजपुरवठा न करता दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वप्नील खाडे यांनी ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जीव गमावत आहेत व त्यासाठी प्रशासनाने व विद्युत महामंडळाने वीजपुरवठा शेतीसाठी दिवसा सोडण्यात यावा अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील खाडे, विकी सदाफुले, नासीर सय्यद, अमित गंभीर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, तालुका जिल्हा व राज्य, स्थानिक शासन संस्था व प्रादेशिक निवडणुकात फक्त माझ्या बळीराजाचे कष्टाचे भांडवल केले जाते. पण या विषयी ठोस निर्णय कोणीही घेत नाही. जामखेड, आष्टी, पाटोदा तालुका परिसरात बिबट्याची दहशत आहे. याबद्दल स्थानिक शासन संस्था आम्हाला, दिवसभरात काय नाही करायला पाहिजे याच्या सूचना देते. पण आमच्या शेतकर्‍यांची जीवन व उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.

रात्रीच्या वेळेस लाईट असल्यामुळे शेतीला पाणी द्यायला शेतात जावे लागत आहे. शेतकरी हा रात्रंदिवस राबत राहतो. पण काही महिन्यांपासून परिसरांमध्ये शेतकर्‍यांना बिबट्याचा वावर दिसून येत आहे. वनविभाग त्यासाठी फक्त प्रयत्नशील आहे. परंतु त्याचा बंदोबस्त अजून झालेला नाही. आमच्या परिसरांमध्ये ना कुठली एमआयडीसी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे वीजेवर लोड येण्याचा प्रश्न येत नाही तर जोपर्यंत शेतकर्‍यांचे ज्वारी भरणा (भिजवणे)आहे तोपर्यंत तरी दिवसाचा वीजपुरवठा करावा, अशी विनंती केली आहे. दिवसाचा वीजपुरवठा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply