Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बिबट्याच्या हल्ल्यात आष्टी पंचायत समिती सदस्याचा पती ठार

पाथर्डी तालुक्यातील घटनानंतर लगतच्या आष्टी तालुक्यातील घटनेने भीतीचे वातावरण

आष्टी । वीरभूमी - Nov 24, 2020 • 12:00 AM 6934 views
पाथर्डी तालुक्यातील तीन बालकांचा बिबट्याने जीव घेतल्याच्या घटनेनंतर आज आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पंचायत समिती सदस्या आशा नागनाथ गर्जे यांचे पती नागनाथ गहिनीनाथ गर्जे (वय 34 वर्षे) हे जागीच ठार झाले. मंगळवारी (ता. 24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नागनाथ गर्जे हे मंगळवारी दुपारी सुरुडी येथील त्यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. अंधार पडण्याची वेळ होऊनही ते घरी परत न आल्याने गावातील काही लोक त्यांना शेतात पाहण्यासाठी गेल्यानंतर नागनाथ गर्जे हे गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत कोसळलेले आढळून आले. त्यांच्या तोंडावर ओरबाडून व चावा घेतल्याने शीर धडासमवेत लोंबकळत असल्याचे आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आष्टी तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर वनविभागाच्या पथकाने आतापर्यंत तीन मादी बिबट्यांना जेरबंद केले आहे. मात्र नरभक्षक बिबट्या मोकाट असल्याचे सांगितले जात होते. आज आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील नागनाथ गर्जे हे बिबट्याच्या हल्ल्याच्या ठार झाल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुरुडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात होते. आज घडलेल्या या घटनेने यावर शिक्कामोर्तब झाले असून यामुळे सुरुडी व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागातील अधिकार्‍यांनी शोधमोहीम राबवून तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply