Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

श्रीगोंद्यात कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन

गोविंदबन कृषी पर्यटन केंद्राकडे पर्यटकांचा ओघ सुरू

श्रीगोंदा । वीरभूमी - Nov 26, 2020 • 12:00 AM 1246 views
तालुक्यातील कोरेगाव येथे गोविंदबन कृषी पर्यटन केंद्राचे गुरुवार दि. 26 रोजी मॅक केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतिष सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शहरी भागातील पर्यटकांकरीता हे पर्यटन केंद्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हुरडा पार्टी केंद्र म्हणून दोन वर्षापुर्वी उदयास आलेले हे केंद्र आज ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले असून आता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडे अधिकृतरीत्या नोंदणी झालेले श्रीगोंदा तालुक्यातील प्रथम व एकमेव ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र आहे.

गुलाबी थंडीतील निसर्ग रम्य वातावरण, गरमा गरम हुरडा, शेंगदाणा चटणी, तिळाची चटणी यांच्या जोडीला वैविध्यपुर्ण गावरान बाज असणारे चुलीवरील खाद्यपदार्थ, ऊसाचा ताजा रस, बैलगाडी, घोडागाडीतून सफारी, लहान मुलांना खेळण्यासाठी भोवरा, विटीदांडू, गोट्या,लगोर बरोबरच विविध खेळणी, क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळाची मैदाने,विविध भाजीपाला व फळ पिकांचे प्लॉट, तसेच सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या कडधान्य, डाळी, चटण्या, भाजीपाला-फळे यांचे शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवरील थेट विक्री केंद्र आणि या जोडीला या केंद्राचे चालक बाळासाहेब मोहारे, दादासाहेब साबळे व त्यांच्या कुटुंबियाचे आदरातिथ्य हे या ठिकाणचे विशेष. शहरातील गोंगाट, दररोजची धकाधकीचे जीवन याला कंटाळलेल्या शहरी नागरिकांना हे ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे.

कार्यक्रमाला डॉ. सतिश सोनवणे, डॉ. शारदा महांडूळे, डॉ. प्रशांत महांडूळे, डॉ. नयना भापकर, डॉ. संतोष भापकर, श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते, सहकारी सोसायटी संघटनाचे जिल्हाध्यक्ष निलेश पवार, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक सुहास इगंवले हे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply