Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू

विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू

अकोले । वीरभूमी - Nov 28, 2020 • 12:00 AM 5086 views
जिल्ह्यातील विविध भागात बिबट्याचा वावर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अकोले तालुक्यातील आंबड परिसरातील मुक्ताईवाडी येथील एका विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. आढळून आलेल्या बिबट्या ही मादी असून या भागात आणखी बिबट्या असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तालुक्यातील आंबड परिसरातील मुक्ताईवाडी येथील गवराम वाळीबा जाधव हे आपल्या विहिरीवर विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना हा बिबट्या विहिरीच्या पाण्यावर मृत अवस्थेत तरंगताना आढळून आला. त्यांनी याबाबत सरपंच दत्तू जाधव यांना माहिती दिली.

तर सरपंच यांनी वनविभागाला ही घटना कळविली. यानंतर वनपाल व्ही. एन. पारधी यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्यास विहिरीबाहेर काढण्यात आला. सदरील बिबट्या हा मादी बिबट्या असून वय 2 ते अडीच वर्षांचे आहे. शिकारीच्या मागे लागताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे यांनी व्यक्त केला.

वन विभागाच्या सुगाव येथील नर्सरीत या बिबट्याचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. भांगरे यांनी शवविच्छेदन केले. या नंतर शासकीय नियमानुसार या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply