Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पोलिसांनी पकडला एक लाखाचा गुटखा

श्रीगोंदा पोलिसांची कारवाई । दोघांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा । वीरभूमी - Nov 29, 2020 • 12:00 AM 1171 views
टाटा इंडिका कारमधून विक्रीसाठी चालवलेला सुगंधी तंबाखू व गुटखा श्रीगोंदा पोलिसांनी शनिवार दि. 28 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास श्रीगोंदा-मांडवगण रस्त्यावरील गणपती मळ्याजवळ पकडला आहे. गाडीत तब्बल 1 लाख 2 हजार तिनशे बत्तीस रुपयांचा गुटखा जप्त करून दोन आरोपींला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांना खबर मिळाली की, श्रीगोंदा-मांडवगण रस्त्यावरून एक टाटा इंडिका कारने बेकायदेशीररीत्या गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीसाठी चालवलेला आहे. रात्री 9 वाजेच्या सुमारास श्रीगोंदा पोलिसांनी गणपती मळ्याजवळ गाडी अडवली असता गाडीत हिरा गुटखा व रॉयल 717 सुगंधी तंबाखू आढळून आली. इंडिका कार व गुटख्याच्या पुड्या मिळून एकूण 1 लाख 2 हजार 332 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस हवालदार प्रताप देवकाते यांच्या फिर्यादीवरून विशाल बोत्रे व नवनाथ शिंदे दोघेही (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) यांच्याविरोधात विनापरवाना बेकायदा गुटखा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळुन आल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुख्य पोलीस हवालदार आर. बी. झुंझार करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply