Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी

पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथील घटना

पाथर्डी । वीरभूमी - Dec 09, 2020 • 12:00 AM 5721 views
पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील मिडसांगवी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 16 वर्षीय तरूणी जखमी झाली असून तिच्यावर खरवंडी कासार येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने तालुक्याच्या पूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आज बुधवार दि. 9 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास तालुक्यातील मिडसांगवी येथील सानिया दिलावर शेख (वय 16 वर्षे) या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. सानियाच्या गळ्याला स्कार्प बांधलेला असल्यामुळे ती बचावली. मात्र बिबट्याने तिच्या हातावर पंजा मारल्याने ती जखमी झाली आहे. तिला खरवंडी कासार येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अगोदर मिडसांगवी येथे बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

या अगोदर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याने दर्शन दिले असून मढी, केळवंडी, शिरापूर येथील तीन बालकांचा बिबट्याने जीव घेतला आहे. वनविभागाच्यावतीने ज्या - ज्या भागात बिबट्या दिसला त्या भागात पिंजरे लावले आहेत. मात्र यातील अनेक पिंजर्‍यामध्ये कोणतेही सावज ठेवले जात नाही. यामुळे वनविभागाकडून पिंजरा लावण्याचा दिखावा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply