Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

राज्यमार्ग ६५ व राज्यमार्ग ७ चा आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत पहिल्या टप्प्यात सामावेश करा

आमदार आशुतोष काळेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

कोपरगाव । वीरभूमी - Dec 17, 2020 • 12:00 AM 907 views
कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या राज्य मार्ग ६५ व राज्यार्ग ७ चा आशियाई विकास बँकेच्या (ADB)अर्थसहाय्य योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश करून निविदा प्रसिद्ध करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांना दिले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील खराब झालेल्या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे प्रयत्न करीत आहेत. मतदारसंघातून जाणाऱ्या झगडे फाटा-तळेगाव-वडगाव पान (राज्य मार्ग ६५) व सावळीविहीर-चास -भरवस-लासलगाव (राज्य मार्ग ७) या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हे दोनही राज्यमार्गांचा आशियाई विकास बँक अर्थसहाय्य (ADB) अंतर्गत समावेश आहे. त्यामुळे या रस्त्यांचा इतर योजनेत समावेश करता येत नसल्यामुळे या राज्यमार्गांचे नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून खराब रस्त्यामुळे अनेक लहानमोठे अपघात घडत आहेत. तसेच सावळीविहीर-चास-भरवस-लासलगाव या सात नंबर राज्यमार्गावरून वर्षभर परराज्यातून साईभक्त येत असतात. त्यांना देखील या खराब रस्त्यामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे प्रमुख राज्यमार्ग खराब झाल्यामुळे या मार्गाने येणाऱ्या वाहनांनी आपला मार्ग बदलून घेतला आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ कमी होवून त्याचा परिणाम राज्यमार्गालगत व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर होवून त्यांचे व्यवसाय थंडावले असून हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहे.

सध्या गळीत हंगाम सुरु असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील या खराब रस्त्यामुळे अडचणी येत आहे. या रस्त्यांमुळे होत असलेल्या अडचणींची दखल घेवून रस्त्यांच्या कामाचा आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश करून निविदा प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनाची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी (राज्य मार्ग ६५) व (राज्य मार्ग ७) या दोनही राज्यमार्गांच्या नूतनीकरणासाठी आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश करणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश येणाऱ्या दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे. यावेळी पुरंदरचे आमदार संजयकाका जगताप, कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply