Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

श्रीगोंद्याजवळ मालगाडीचे 12 डबे घसरले

दौंड - मनमाड रेल्वे वाहतूक विस्कळीत । कोणतीही जीवितहानी नाही

अहमदनगर । वीरभूमी - Dec 23, 2020 • 12:00 AM 2672 views
मनमाड-दौंड रेल्वेमार्गावरील श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी पहाटे मालगाडीचे 12 डबे घसरले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, यामुळे रेल्वेरुळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या मार्गावरून धावणार्‍या पाच गाड्या पुणेमार्गाने वळवण्यात आल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दौंडकडून मनमाडकडे 42 डबे असलेली मालगाडी जात होती. यामध्ये सिमेंट होते. दरम्यान नगर जिल्ह्यातून जात असताना श्रीगोंदा ते बेलवंडी स्टेशनच्या दरम्यान गाडीचे 12 डबे घसरले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा झाली आहे.

दौंड-मनमाड सेक्शन मध्ये मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे खालील गाड्या डायवर्ट केल्या आहेत. दरम्यान वेळापत्रकानुसार धावत असलेल्या गाड्या दुसर्‍या मार्गाने डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास थोडा उशीर लागणार आहे. अपघात झाला तेव्हा या मार्गावरून धावत असलेल्या गाड्या जवळच्या स्थानकांवर थांबवण्यात आलेल्या होत्या. यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या मालगाडीच्या अपघाताने इतर रेल्वे गाड्या या पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

मार्ग बदलल्याने आता या रेल्वे काही तासाने उशिरा धावणार असल्याचे समजते. मालगाडीचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. सुदैवाने रेल्वे मालवाहतूक असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र रेल्वे डबे व रेल्वे रुळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply