Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

येरवाड्यातून पळालेला आरोपी कर्जत तालुक्यात पकडला

कर्जत उपविभागिय पोलिस अधीक्षकांची कारवाई

कर्जत । वीरभूमी - Jan 07, 2021 • 12:00 AM 1966 views
येरवडा कारागृहाचे गज कापून फरार झालेला आरोपी जेरबंद करण्यात कर्जत उपविभागिय अधिक्षकांना यश आले असून या आरोपीला कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात सापळा रचुन जेरबंद केले. ही कारवाई कर्जतचे पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी बुधवारी रात्री केली.

कर्जतचे पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, येरवडा कारागृहातुन गज कापुन फरार झालेला आरोपी अनिल विठ्ठल वेताळ (वय 22, रा. शिरूर, जि. पुणे) हा कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात येणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आपल्या कार्यालयीन पथकास योग्य सुचना देऊन राक्षसवाडी शिवारात माळरानावर रात्री दोनच्या सुमारास सापळा रचून आरोपी वेताळ यास ताब्यात घेण्यात यश मिळवले.

सदर आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याच्या विरुद्ध पुणे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, असे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत असून येरवडा कारागृहातून गज कापून पळाल्याने येरवडा पोलीस ठाण्यात कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सफौ. गौतम फुंदे, पोना. केशव व्हरकटे, अप्पासाहेब कोळेकर, पोकॉ. हृदय घोडके, इरफान शेख, सागर जंगम, आदित्य बेल्हेकर, दादाराम म्हस्के, संतोष साबळे, मच्छिंद्र जाधव आदी सहभागी झाले होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply