Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

वृद्धेश्वरसाठी उमेदवारी दाखलचा पहिला दिवस निरंक

13 जणांनी नेले 28 उमेदवारी अर्ज

पाथर्डी । वीरभूमी - Jan 07, 2021 • 12:00 AM 1489 views
तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळीस आज गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक राहीला आहे. तर 13 इच्छुकांनी 28 उमेदवारी अर्ज व 7 जणांनी 13 मतदार याद्या नेल्या आहेत.

पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणुन पाथर्डी-शेवगावचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे काम पाहणार आहेत.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक राहीला आहे. मात्र 13 जणांनी 28 उमेदवारी अर्ज तर 7 जणांनी 13 मतदार याद्या नेल्या आहेत.

उमेदवारी अर्ज व मतदार याद्या घेऊन जाणार्‍या उमेदवारांमध्ये गोरक्ष कारभारी फुंदे (1), अमोल अच्युतराव वाघ (4), गहिनीनाथ पाटीलबा ढाकणे (1), अंबादास धोंडीबा बळीद (1), परसराम नामदेव लोंढे (2), भाऊसाहेब मळू उघडे (2), रत्नप्रभा शेषराव कचरे (2), शेषराव सूर्यभान कचरे (2), वैभव पोपटराव आंधळे (2), मंगलताई अर्जुन राजळे (2), शिवशंकर अर्जुन राजळे (4), अर्जुन दादाबा राजळे (4), बापुसाहेब गोविंद घोरपडे (1) यांचा समावेश आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply