Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

२०१९ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर

२०१९ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर

अहमदनगर । वीरभूमी - Jan 21, 2021 • 12:00 AM 984 views
पुरोगामी विचारांच्या, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ‘विळखा’, ‘सुनदी’, ‘जीवन संघर्ष’, ‘विजेता’, ‘अबोल अश्रू’ सह आकरा पुस्तकांना २०१९ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर करण्यात येत आहेत, अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.

नवोदित लेखक, कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा, विविध पुरस्कार, पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून “राज्यस्तरीय वाड्मय स्पर्धा” आयोजित करण्यात येतात.

कविवर्य चंद्रकांत पालवे, प्रा.शर्मिला गोसावी, सुभाष सोनवणे, श्याम शिंदे, प्रा.डॉ.अशोक कानडे, भाऊसाहेब सावंत, प्रा. मारुती सावंत यांनी परीक्षक म्हणून यावर्षी काम पाहिले. त्यानुसार २०१९ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ” पुढीलप्रमाणे जाहिर होत आहेत. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, बुके व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना मध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.

त्यामध्ये कांदबरी – विळखा, दशरथ चौरे, अहमदनगर, काव्यसंग्रह – सुनादी,मांगीलाल राठोड, बुलढाणा गझलसंग्रह - हे बंध रेशमाचे, बबन धुमाळ, दौंड, कथासंग्रह - अबोल अश्रू, प्रा.डॉ.गिरीश खारकर, अमरावती, लेखसंग्रह - कृतार्थता, डॉ.अशोक ढगे, नेवासा, आत्मचरित्र - जीवन संघर्ष, भानुदास आहेर, सावेडी, समिक्षाग्रंथ - उलगडलेल्या नव्या उजेडवाटा, एकनाथ खिल्लारे, औरंगाबाद, संकीर्ण - कुंकू ते दुनियादारी, प्रा.डॉ.राजेंद्र थोरात, पुणे, बाल कथासंग्रह – विजेता, उमेश घेवरीकर, शेवगांव, बाल काव्यसंग्रह – काव्यश्रुती, कु.श्रुती गालफाडे, लातूर व आभाळ माया, कु.अस्मिता मराठे, लाड जळगाव या पुस्तकांचा पुरस्कारामध्ये समावेश आहे.

पुरस्कार विजेत्यांचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत, भाऊसाहेब सावंत, डॉ.राधाकृष्ण जोशी, अजयकुमार पवार, किशोर डोंगरे, बबनराव गिरी, भारत गाडेकर, ज्ञानदेव पांडूळे, विनायक पवळे, राजेंद्र फंड यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply