Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

मुळा नंतर ज्ञानेश्वर साखर कारखाना निवडणुकही बिनविरोध

मुळा नंतर ज्ञानेश्वर साखर कारखाना निवडणुकही बिनविरोध

भेंडा । वीरभूमी - Jan 21, 2021 • 12:00 AM 2444 views
नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा साखर कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 21 जागेसाठी 21 अर्ज शिल्लक राहील्याने बिनविरोध झाली आहे.

सभासदांनी पुन्हा एकदा माजी आ. नरेंद्र घुले व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागेसाठी पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल 282 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दाखल अर्जाची दि. 6 जानेवारी रोजी छाननी होऊन 147 अर्ज अपात्र तर 135 अर्ज पात्र ठरले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या (गुरुवार दि. 21) दिवशी 114 उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळाच्या सर्व 21 जागासाठी 21 अर्ज राहील्याने संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे- शेवगाव गट (2 जागा)- सुधाकर नारायणराव नरवडे व पंडीत रामभाऊ भोसले. शहरटाळकी गट (2 जागा)- नरेंद्र मारुतराव घुले व चंद्रशेखर मारुतराव घुले. कुकाणा गट (2 जागा)- पांडुरंग गमाजी अभंग, नारायण कारभारी म्हस्के. नेवासा गट (3 जागा)- विठ्ठलराव वकीलराव लंघे, काकासाहेब आबासाहेब शिंदे, गोरक्ष दगडू गंडाळ. वडाळा गट (3 जागा)- भाऊसाहेब सोन्याबापू कांगुणे, जनार्धन रामभाऊ कदम, शिवाजी राजधर कोलते.

ढोरजळगाव गट (3 जागा)- मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, बबनराव मुरलीधर भुसारी, सखाराम दिगंबर लव्हाळे. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ (1 जागा)- दीपक तुळशीराम नन्नवरे. महिला प्रतिनिधी मतदार संघ (2 जागा)- ताराबाई हनुमान जगदाळे व रत्नमाला काशिनाथ नवले. भटके-विमुक्त मतदार संघ (1 जागा)- लताबाई अशोक मिसाळ. नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदार संघ (1 जागा)- शंकर लक्ष्मण पावसे. उत्पादक सहकारी संस्था व बिगर उत्पादक पणन संस्था मतदार संघ (1 जागा)- देसाई भाऊसाहेब देशमुख या प्रमाणे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे.

कारखान्याच्या सभासदांनी पुन्हा एकदा घुले बंधूंवर विश्वास दाखवला आहे. नूतन संचालकांमध्ये अनेक नव्या चेहर्‍यांना घुले बंधू यांनी संधी दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply