Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दुहेरी हत्याकांडाचा तपास लागत नाही तोच शेवगावात आढळला तरुणाचा मृतदेह

दुहेरी हत्याकांडाचा तपास लागत नाही तोच शेवगावात आढळला तरुणाचा मृतदेह

शेवगाव । वीरभूमी - Jan 27, 2021 • 12:00 AM 8583 views
रविवारी शेवगावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा तपास लागला नाही तोच शेवगाव - नेवासा रस्त्यावरील ढोरा नदी पात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मयताचे नाव जय राजेश वखरे (वय-२१) असे असून त्याच्या खिशात सापडलेल्या दोन आधार कार्डवर परभणी व बीड असे वेगवेगळे रहिवाशी ठिकाण आहेत. मात्र ही हत्या की आत्महत्या याबाबत नागरीकांमध्ये चर्चा सुरु आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव - नेवासा रस्त्यावरील ढोरा नदी पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही जणांनी आज बुधवार २७ रोजी दुपारी पाहीले. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पो. हे. काँ. मरकड, बप्पासाहेब धाकतोडे, वैजनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला.

त्यावेळी त्याच्या अंगात पुर्ण बाह्याचा इन केलेला शर्ट व जीन्स पँन्ट आढळून आली. त्याच्या चेह-यावर मारहाणीच्या जखमा आहेत. तर खिशामध्ये सापडलेल्या दोन आधार कार्डवर जय राजेश वखरे (वय-२१) असे असून रहिवाशी ठिकाण मात्र परभणी व बीड असे दोन वेगवेगळे आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत संशय व्यक्त होत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, शहरात दोन दिवसापूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यातच आज पुन्हा तरुणाचा मृतदेह आढळल्याने शेवगाव शहर व परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply