Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

जामखेड पोलिसांनी जप्त केली आफूची झाडे

आरोपीलाही केली अटक

खर्डा । वीरभूमी - Feb 26, 2021 • 12:00 AM 2626 views
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर वासुदेव महादेव काळे यांनी लावलेली अफूची झाडे जामखेड पोलिसांनी जप्त केली आहेत. जामखेड पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा टाकून तब्बल 1 लाख 70 हजार रुपये किंमतीची 56 किलो आफुची झाडे जप्त करून आरोपीस अटक केली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त खबरीकडून माहीती मिळाली की, जातेगाव येथील काळेवस्तीवर अफुची झाडे आहेत.

या माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरील ठिकाणी छापा टाकला असता आरोपी वासुदेव महादेव काळे (रा. काळे वस्ती, जातेगाव) याने त्याच्या मालकीच्या गट नंबर 1077 मधील शेतात अफूची झाडे आढळून आली.

पोलिसांनी ही झाडे जप्त केली असून याचे वजन यब्बल 56 किलो आहे. तर याची किंमत तब्बल 1 लाख 69 हजार 815 रुपये एवढी आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी वासुदेव काळे याला अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह पो. हे. कॉ. संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदीप राऊत, अविनाश ढेरे यांच्या पथकाने गुरुवारी (दि.25) सायंकाळी करून रात्रीच गुन्हा दाखल केला. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वासुदेव महादेव काळे याच्या विरोधात अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी (उत्तेजक) पदार्थ अधिनियम सन 1985 च्या कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply