Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

या तारेखनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार

या तारेखनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार

नवी दिल्ली- Mar 15, 2021 • 12:00 AM 3751 views
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे आतापर्यंत सात हप्ते शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून आठवा हप्ता 10 एप्रिल नंतर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आतापर्यंत सात हप्त्यांमध्ये 14 हजार रुपये मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत. किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 11.66 कोटी शेतकर्‍यांना 1.15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. शेतकर्‍यांनी त्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचण असल्यास दुरुस्ती करणं आवश्यक आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो.

पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही शेतकर्‍यांच्या रेकॉर्डमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. जर सर्व शेतकर्‍यांचं रेकॉर्ड दुरुस्त केले तर सर्व नोंदणीकृत शेतकर्‍यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकर्‍यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी शेतकर्‍यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दुरुस्ती असेल तर करुन घ्यावी लागणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply