Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अखेर अकोलेत राजकीय भूकंप

पिचडांना धक्का देत सीताराम गायकर राष्ट्रवादीत; मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश

अकोले । वीरभूमी - Mar 15, 2021 • 12:00 AM 2793 views
अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांना धक्का देत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मंगळवार दि. 16 रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. याच वेळी अकोले भाजपाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते.

ऐन अकोले नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर सीताराम गायकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा पिचडांना मोठा धक्का मानला जात आहे. आता सीताराम गायकर यांच्यासोबत कोण - कोण प्रवेश करणार, या बाबत अकोले तालुक्यात चर्चेंला उधाण आले आहे.

तालुक्यातील सहकारी संस्थेचे अनेक संचालक प्रवेश करणार आहे. त्यांची अधिकृत नावे समजू शकली नाहीत. मात्र राष्ट्रवादी पक्षात गायकर यांचा प्रवेश झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजिविनी मिळणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बोलल जात आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन आलेले गायकर यांनी आपल्या विविध पक्षात मोठा मित्र परीवार जोपासला आहे. तसेच गायकर हे सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात.

एक उसतोड मुकादम ते कारखान्याचे व्हा.चेअरमन ते जिल्हा बँकेचा चेअरमन हा प्रवास चळवळीतून झालेला आहे. सहकारात असलेला नेता म्हणून अकोले तालुक्यात गायकर यांची ख्याती असुन यामुळे त्यांचा आभ्यासाचा फायदा हा पुुुुढील सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, बाजार कमेटी, दुध संंघ या निवडणुकीत होईल. याच कारणांमुळे गायकर यांच्या प्रवेशामुळे बहुजन समाजाचे नेतृत्वाचा अभ्यास व त्यांच्याशी असलेला स्नेह पाहता गायकर हे राष्ट्रवादी पक्षाला फायदेेेशीर ठरणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश होणार आहे. उद्या होणार्‍या पक्ष प्रवेशात अनेक छोटे-मोठे नेते त्यांच्यासोबत पक्ष प्रवेश करतील, तसेच कोरोनाचा संसर्ग असल्याने हा पक्ष प्रवेश सोहळा मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडणार आहे. सीताराम पाटील गायकर हे अजित पवारांचे पहिल्यापासून खंद्दे समर्थक आहे. मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर माजी मंत्री मधुकरराव पिचडांच्या सोबत नाईजास्तव भारतीय जनता पार्टी या पक्षात त्यांना प्रवेश करावा लागला.

गायकर हे भाजपात गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून तर जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेपर्यंत गायकर हे अजित पवारांच्या सतत संपर्कात होते. त्यातच उद्याच्या पक्ष प्रवेशात काँग्रेस,शिवसेना, भाजपाचे काही नेते प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply