Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

राजीनाम्याच्या बातम्यात तथ्य नाही

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्विट

मुंबई । वीरभूमी - Mar 20, 2021 • 12:00 AM 1048 views
पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक व मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घेण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

काल दिवसभर राजीनाम्याची चर्चा विविध प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर संध्याकाळी अनिल देशमुख यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणाले की, आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मागील दोन दिवसांत मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाविषयी एटीएस आणि एनआयएने केलेल्या तपासाची चर्चाही झाली. दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या, त्यात कोणतेही तथ्य नाही, असेही अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांनी हाताळलं आहे, त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. शरद पवार यांनी मागील काही दिवसात राज्यातील काही आयपीएस अधिकार्‍यांशी देखील चर्चा केली आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.

दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरू होती.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply