Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डी तालुक्यात गारांचा पाऊस; शेतीपिकांचे नुकसान

पाथर्डी तालुक्यात गारांचा पाऊस; शेतीपिकांचे नुकसान

पाथर्डी । वीरभूमी- Mar 20, 2021 • 12:00 AM 5180 views
पाथर्डी तालुक्याच्या काही भागात आज शनिवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान झालेल्या गारपिटीने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकर्‍यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील काही भागात आज शनिवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सुरुवातीला गारा पडल्याने शेती पिकांचे नुकसान झाले. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे, साकेगाव, चितळी, पाडळी, ढवळेवाडी, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी आदी भागात जोरदार वार्‍यासह गारांचा पाऊस झाला.

गारांच्या पावसाने शेतातील गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, ऊस, मका आदी पिकांसह चारा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच गारांमुळे आंबा, चिकू यांचे नुकसान झाले तर डाळिंबाचा बहार धरलेल्या शेतकर्‍यांनाही चांगलाच फटका बसला आहे. काही भागात 15 ते 20 मिनिटे पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी वाहत होते. गारांच्या मार्‍यामुळे झाडांची पानगळही झाली.

हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेती पिकांबरोबरच वीट भट्टी चालकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस तोडणी कामगारांनाही मोठा फटका बसला. अचानक आलेल्या पावसाने ऊस ोडणी कामगारांचा झोपडीतील संसार ओलाचिंब झाला होता.

पाथर्डी तालुक्यात झालेल्या गारांच्या पावसाने नुकसानची पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply