Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात

गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात

शेवगाव । वीरभूमी- Mar 20, 2021 • 12:00 AM 7338 views
मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी केलेल्या मारहाणीत ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे (वय 42 वर्षे) याचा मृत्यू झाला. मारहाण करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात आणला. दुपारी 4 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यात आणुन ठेवण्यात आला.

यामुळे काहीकाळ वातावरण तणावग्रस्त बनले होते. यानंतर शेवगाव पोलिस ठाण्यात मारहाण करणार्‍या पाच जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याने तणाव निवाळला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे (वय 42) हा शुक्रवार दि. 19 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान बोधेगाव येथे डिझेल आणण्यासाठी मोटारसायकलवर गेला होता. बोधेगाव येथून डिझेल घेऊन येतांना शिंदळीच्या ओढ्यात हरिभाऊ बडधे याला किशोर उद्धव दहफिळे, दिलीप महादेव दहिफळे, सुनील दिलीप दहिफळे, अनिल दिलीप दहिफळे, सोमनाथ सोन्याबापू दहिफळे (सर्व रा. ठाकुर पिंपळगाव) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण केली.

वरील पाच जणांनी मारहाण केल्यानंतर हरिभाऊ हा घरी आला असता लहान भाऊ नारायण पांडुरंग बडधे याला सर्व हकीगत सांगितली. यावेळी नारायण याने काही घाबरू नको, काय असेल ते आपण सकाळी पाहु, असे म्हणुन तो आपल्या कामावर निघून गेला. शनिवारी सकाळी नारायण बडधे हा हरिभाऊ बडधे याला झोपेतून उठवण्यासाठी गेला असता तो मयत झाल्याचे लक्षात आले.

त्याला शेवगाव उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मारहाण करणार्‍या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सायंकाळी 4 वाजता रुग्णालयातून मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात आणला.

पोलिस ठाण्यात मृतदेह आणल्यानंतर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मारहाण करणार्‍या आरोपींवर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

त्यानंतर सायंकाळी 7 वाजता शेवगाव पोलिस ठाण्यात मारहाण करणारे किशोर उद्धव दहफिळे, दिलीप महादेव दहिफळे, सुनील दिलीप दहिफळे, अनिल दिलीप दहिफळे, सोमनाथ सोन्याबापू दहिफळे (सर्व रा. ठाकुर पिंपळगाव) यांच्यावर नारायण पांडुरंग बडधे यांच्या फिर्यादीवरून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply