Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लग्न लावून देत नाही म्हणुन तरुणाने केली मावशी व आजीची हत्या

लग्न लावून देत नाही म्हणुन तरुणाने केली मावशी व आजीची हत्या

हिंगोली- Mar 21, 2021 • 12:00 AM 2236 views
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे लग्न का करून देत नाही, असे म्हणत एका तरुणाने आई, मावशी अन् आजी यांच्या डोक्यात वार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

या घटनेत मावशी व आजीचा मृत्यू झाला तर, आई गंभीर जखमी झाली असून हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची नावे मंगलाबाई उत्तम बशिरे (वय 42, रा. परभणी), देवकाबाई किसन पहारे (वय 85) अशी आहेत.

पुसेगाव येथील अनुसयाबाई नंदुलाल चर्‍हाटे पुसेगाव शिवारात आई देवकाबाई किसन पहारे यांच्यासोबत राहत. त्यांचा मुलगा रोहिदास नंदुलाल चर्‍हाटे (वय 28) हा पुसेगावात एका हॉटेलमध्ये काम करतो. दरम्यान, काही दिवसांपासून रोहिदास याने लग्न करून देण्यासाठी त्याची आई अनुसयाबाई यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

यामुळे रोहिदास हा आठ दिवसांपासून संतापलेला होता. त्यातच त्याची मावशी मंगलाबाई उत्तम बशिरे (वय 42, रा. परभणी) या बहीण अनुसयाबाई व आई देवकाबाई यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे त्या तिघीही शेतातील टीनशेडच्या आखाड्यावर राहू लागल्या.

दरम्यान, शनिवारी सकाळी आठच्या सुमारास रोहिदासने मावशी मंगलाबाई यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचा वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुर्‍हाडीच्या दांड्याने देवकाबाई व अनुसयाबाई यांच्या डोक्यात वार केले. यात दोघी जखमी झाल्या. रोहिदास याचा चुलत भाऊ व अन्य तिघांनी हा प्रकार पाहिला. रोहिदास त्यांच्याही मागे लागल्याने ते पळून गेले.

काही वेळानंतर त्यांनी जखमी झालेल्या देवकाबाई पहारे व अनुसयाबाई चर्‍हाटे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच देवकाबाई यांचा मृत्यू झाला, तर अनुसयाबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply