Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नुकसानग्रस्त पिकांच्या पहाणीसाठी आ. राजळे शेतकर्‍याच्या बांधावर

प्रशासनाला पंचानाम्याचे आदेश । नुकसान भरपाई द्या ः शासनाकडे मागणी

पाथर्डी । वीरभूमी- Mar 21, 2021 • 12:00 AM 1707 views
शनिवारी दुपारी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावात गारपीट होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज रविवारी पहाणी करत हतबल शेतकर्‍यांना दिलासा दिला.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धिर देत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश दिले. तसेच राज्य शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिले.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावात शनिवारी दुपारी वादळी वार्‍यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे गहु, कांदा, हरभरा, ऊस, चारा पिके व आंबा, चिकु, संत्रा आदी फळ पिकांचेही नुकसान झाले. या नुकसानीचे आज रविवारी आमदार मोनिकाताई राजळे यांनी पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर दिला.

यावेळी त्यांच्या सोबत प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, जि. प. सदस्य राहुल राजळे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, गोकुळ दौंड आदीसह कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व कार्यकर्ते उपस्थित होते.

रविवारी सकाळी पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी येथून आ. राजळे यांनी पहाणीला प्रारंभ केला. या पहाणीमध्ये साकेगाव काळेगाव, सुसरे, प्रभूपिंप्री, पागोरी पिंपळगाव, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, खेर्डे, माळेगाव, निपाणी जळगाव, कोरडगाव, कोळसांगवी, जिरेवाडी, सोनोशी तसेच शेवगाव तालुक्यातील आखेगाव तीतर्फा व आखेगाव डोंगर या गावातील नुकसानग्रस्त भागांची पहाणी केली.

यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आ. मोनिकाताई राजळे यांनी देत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply