Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

डॅशिंग डीवायएसपी संदीप मिटकेंची धडाकेबाज कारवाई

हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापे । तीन पिडित महिलांची केली सुटका

अहमदनगर । वीरभूमी- Oct 26, 2021 • 12:00 AM 4387 views
श्रीरामपूर येथे डॅशिंग कामगिरी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे नगर शहराचा चार्ज देण्यात आला आहे. चार्ज घेताच डीवायएसपी संदीप मिटके यांनी शहरातील वाणीनगर व केडगाव येथील अंबिकानगर येथील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापे टाकून पाच पिडीत महिलांची सुटका करत तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या धडक कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील वाणी नगर व केडगाव येथील अंबिकानगर येथे हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत डीवायएसपी संदीप मिटके यांना समजली. माहितीची खातरजमा करून डीवायएसपी संदीप मिटके यांनी पथकासमक्ष वाणी नगर येथील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर पंचासमक्ष छापा टाकला.

यामध्ये पिडीत एका परप्रांतीय (बंगाली) महिलेची सुटका केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक एकनाथ लांडगे (वय 30) व सागर जाधव यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात स्त्रीयांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

डीवायएसपी संदीप मिटके यांनी पथकासह केडगाव येथील अंबिकानगर येथील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा टाकून दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोना. शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पोपट ओव्हळ (रा. माळीवाडा, अहमदनगर) याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात स्त्रीयांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संपत शिंदे, पोलिस निरीक्षक गडकरी, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, स.फौ. राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ. सुरेश औटी, पो. कॉ. तरटे, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, मपोकॉ. जयश्री सुद्रिक, मपोकॉ. प्रियंका भिंगरदिवे आदींनी केली.

नगर शहराचा चार्ज घेतल्यानंतर डीवायएसपी संदीप मिटके यांनी एकाचवेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकून तीन पिडीत महिलांची सुटका करत तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणे उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन महिलांकडून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या कारवाईने नगर शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply