Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

अवकाळी नुकसानग्रस्त सभासदांना केदारेश्वरकडून चार हजाराची मदत

अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांची माहिती । नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

बोधेगाव । वीरभूमी- Mar 21, 2021 • 12:00 AM 1862 views
शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त ऊस उत्पादकांना केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने चार हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी केली.

रविवारी अ‍ॅड. ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव, शेकटे, नागलवाडी, गोळेगाव या नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. यावेळी शेतकर्‍यांना धीर देत अ‍ॅड. ढाकणे बोलत होते.

शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव तसेच बोधेगाव जिल्हा परिषद गटात शनिवार दि. 20 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारांच्या मार्‍याने कांदा, गहु, ऊस, बाजरी, पपईसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांचे आश्रू पुसण्यासाठी नुकसानीच्या दुसर्‍या दिवशी केदारेश्वर सहकारी साखर कारण्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली.

यावेळी शेतकरी विमल महादेव वैद्य, बबन तहकीक, संजय आंधळे, कालिदास आंधळे, पंढरीनाथ ढाकणे यांच्या गहु, बाजरी, पपई, कांदा, ऊस आदी पिकांची पहाणी केली. यादरम्यान केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त कारखाना कार्यक्षेत्रातील कुटुंबातील एका सभासदाला चार हजाराची मदत तर वार्‍यामुळे भुईसपाट झालेल्या उसाला तात्काळ तोड देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

कारखाना सभासद सोडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना समक्ष भेटून मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी सांगितले.

यावेळी व्हा. चेअरमन डॉ. प्रकाश घनवट, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी सहाय्यक गजानन चव्हाण, सुभाष बारगजे, केदारेश्वरचे सचिव राजेंद्र दराडे, अंबादास दहिफळे, गोळेगावचे सरपंच संजय आंधळे, कालिदास आंधळे, लाडजळगावचे सरपंच काकासाहेब तहकीक, उपसरपंच दत्ता तहकीक, भाऊसाहेब क्षीरसागर, तात्यासाहेब मार्कंडे, नामदेव सानप, भुंजग फुंदे आदी शेतकरी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply