Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

गट नंबर हाच घटक धरुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या

जनशक्तीचे अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांची मागणी । महसूलमंत्री ना. थोरात यांना दिले निवेदन

शेवगाव । वीरभूमी- Mar 22, 2021 • 12:00 AM 1380 views
दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, रोगराई अशी नैसर्गिक आपत्ती आल्यास पंचनामे करताना नुकसान भरपाईसाठी मंडलानुसार निकष बदलून ज्या-त्या गावच्या शेतकर्‍यांचा गट नंबर हाच घटक धरून नुकसान भरपाईचे निकष ठेवण्यात यावेत, अशी मागणी जनशक्तीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन महसूलमंत्री यांना ईमेल द्वारे तर तहसील कार्यालय व तालुका कृषी विभागाला प्रत्यक्ष दिले आहे.

नायब तहसीलदार व्ही. के. जोशी व तालुका कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांना समक्ष देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती ही शेतकर्‍यांच्या पाचवीला पुंजलेली आहे. दरवर्षी अगर कधीकधी सलगपणे रोगराईमुळे, अवेळी झालेल्या पावसामुळे, नापिकीमुळे अगर अन्य संकटामुळे शेतकर्‍यांच्या शेतीवर आपत्ती येणे हे नित्याचे झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला जाण्याच्या संकटाला तोंड देत शेतकरी तग धरून शेती करत आहे. अशा संकटाच्या वेळेला नित्याप्रमाणे पंचनामे करण्याची मागणी केली जाते. पंचनामे देखील होतात. त्यानुसार कधी नुकसान भरपाई मिळते तर कधी मिळतही नाही. मिळणार्‍या भरपाईचे प्रमाण ईतके अल्प असते की, शेतकर्‍यांची चेष्टा केल्यासारखेच होते.

दि.20 मार्च 2021 रोजी शेवगाव-पाथर्डी तालुक्याला वादळी वार्‍यासह गारपीटीच्या पावसाने झोडपले. सुपारी एवढ्या गारा यावेळी बरसल्या. काढणीला आलेल्या हरभरा पिकावर गारा पडल्यानंतर अक्षरशः संपूर्ण हरभरा तयार झालेल्या घाट्यापासून शेतात विखुरला गेला. त्यामधील काही पाण्यात वाहून गेला तर काही फुगून खराब झाला. कांद्यावर पडलेल्या गारीमुळे कांद्याच्या पाती मोडल्या गेल्या व त्यामध्ये पाणी शिरल्याने कांदा सडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जरी त्यातून तो आला तरी तो कांदा लगोलग मार्केटला विकावा लागतो. त्याची जास्त दिवस साठवण करता येत नाही. अशी कांदा व हरभरा सह आदि पिकांची परिस्थिती गारपीट भागात झाली आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला त्यांनी जनावरांना चार्‍यासाठी मका, घास आदी पिके घेतली होती. हे पिके देखील गारपिटीने शेतात जमीनदोस्त झाले आहेत. काढणीला आलेला गहू अक्षरशः शेतात आडवा झाला आहे. भानुदास पालवे, सदाशिव विघ्ने यांच्या शेतामध्ये काढणीला आलेला गहू शेतात सध्या लोळत आहे.

आप्पासाहेब पायघन यांनी गट नंबर 423 मध्ये टरबूज पिक घेतले होते. त्यांच्या टरबुजाच्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून 1000 पपई झाडे लावली होती. पती-पत्नीने रात्रंदिवस कष्ट करून उगवलेले पिक सुपारीएवढ्या गारांनी झोडपले आहे. सदरच्या पिकाचे जनावरे व चोरांपासून संरक्षणासाठी सदर दाम्पत्य शेतात वास्तव्य करायचे. आता त्यांनी वर्षभर करायचे काय? अन्यत्र शेतीस जोडधंदाही त्यांना नाही. अशा शेतकर्‍यांच्या दुःखाला पारा राहिलेला नाही.

कृषी अधिकारी यांचे नेहमी प्रमाणे पंचनामे होणारच आहेत. तथापि ही नुकसान भरपाई देताना सातत्याने मंडलानुसार सर्वेक्षण केले जाते. माझ्या माहितीप्रमाणे विविध प्रगत देशात नुकसान भरपाई निकष हे त्या त्या शेतकर्‍याची झालेल्या नुकसानीचे प्रमाण पाहून संपूर्ण भरपाई करून दिली जाते.

आपण प्रगत महाराष्ट्राचे संवेदनशील महसूलमंत्री आहात. याबाबत महसूल, कृषी, अर्थ खाते यांच्याशी योग्य तो समन्वय साधून मंडल हा घटक रद्द करून त्या-त्या गावच्या शेतकर्‍यांचा गट नंबर हा घटक धरून नुकसान भरपाईचे निकष ठेवण्यात यावेत. थोडक्यात गट नंबर हाच नुकसान भरपाईची निकष ठेवण्यात यावा. आधुनिक तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, त्या-त्या गटात नुकसान झालेले आहे का नाही सॅटेलाईट द्वारे पाहणे देखील शक्य आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी, पुढार्‍यांनी, विविध पक्षांनी नुकसान भरपाई मागणी करण्याची आणि त्यांच्याकडे नुकसान भरपाईची भीक मागण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे.

ही नुकसान भरपाईची भीक मागण्याची वेळ येऊ नये व त्याला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सॅटेलाईटद्वारे त्या गट नंबरची पाहणी करून झालेल्या नुकसान भरपाईचा आंदाज घेऊन त्या शेतकर्‍यांच्या खात्यात त्याने न मागता नुकसान भरपाईची रक्कम प्रधान करण्यात यावी, तरच शेतकर्‍यांची मान ताठ राहील. या मुद्दावर पुढाकार घेऊन राज्यव्यापी नवीन धोरण अगर त्या-त्या नुकसान झालेल्या शेतकर्‍याला अजून चांगल्या प्रकारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी उत्तम फॉर्मुला असेल तो नव्याने अंमलात आणावा व कोट्यावधी शेतकर्‍यांच्या दुवा आपण घ्याव्यात असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, सचिव जगन्नाथ गावडे, विष्णू दिवटे, राजेंद्र पोटफोडे, ज्ञानेश्वर काटे, महादेव डोंगरे, जगताप विजय, पांडुरंग मराठे, विजय काटे, तुलशीराम रुईकर, दिनकर ढाकणे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply