Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पहाणी

अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पहाणी

शेवगाव । वीरभूमी- Mar 21, 2021 • 12:00 AM 1531 views
शेवगाव-पाथर्डी तालुक्यामध्ये दि. 20 रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वार्‍यासह गारीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी आज सकाळी केली.

यावेळी शंकरराव काटे, अर्जुन काटे, भानुदास पालवे, सदाशिव विघ्ने, ज्ञानेश्वर गोर्डे, अशोक काकडे, महादेव डोंगरे, रामनाथ काटे, विठ्ठल मराठे, नितीन पायघन, मोहनराव कातकडे, सुरेश पायघन, प्रकाश वैरागळ, भाऊराव शिंदाडे, एकनाथ पायघन, बापूसाहेब पायघन, भाऊसाहेब मराठे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. काकडे म्हणाले की, दि.20 रोजीच्या अवकाळी वादळ वार्‍यासह गारांच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये मका, गहू, हरभरा, कांदे, बाजरी यासह पपई, पेरू, आंबा आदी फळबागांचाही समावेश आहे. सध्या सर्वत्र मका, गहू, हरभरा, बाजरी काढणीला आले होते. परंतु काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. पंचनामे करताना मंडलानुसार नुकसान भरपाई हा निकष बाजूला ठेवून प्रत्यक्ष गटानुसार पाहणी करून नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणीही यावेळी अ‍ॅड. काकडे यांनी केली.

बँकेकडून अथवा पाहुण्या रावळ्यांकडून पैसे घेऊन बियाणे, पेरणी, लागवड, खते आदी वर मोठ्या प्रमाणात खर्च करून पिकांची मुलाप्रमाणे काळजी घेऊन वाढवले होते आणि आता झालेल्या वादळी वार्‍यामुळे काढणीला आलेले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे बापूसाहेब पायघन यांनी सांगितले.

तर जनशक्ती विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष संजय आंधळे म्हणाले की, मागील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे अजूनही काही भागात नुकसान भरपाई मिळाली नाही आणि अशातच काल झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले पीक शेतकर्‍यांना मुकावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply