Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

दारूड्या बापाकडून अठरा वर्षीय मुलाची हत्या

पत्नीने दिली पती विरोधात फिर्याद

शेवगाव वीरभूमी- Mar 30, 2021 • 12:00 AM 3910 views
दारुच्या आहारी गेलेल्या बापाने आपल्या 18 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून हत्या केली. मयताचे नाव सोमनाथ गोरख करपे (वय 18) असे आहे.

ही हृदयद्रावक घटना मयत मुलगा हा आईसोबत उसाला पाणी देत असतांना शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बापा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे ताराबाई गोरख करपे यांचा पती हा दारुच्या आहारी गेल्याने पती-पत्नीत कायम वाद होत होते. सोमवार दि. 29 रोजी नेहमीप्रमाणे गोरख हा दारू पिऊन घरी आला होता.

यावेळी पत्नी ताराबाई यांना आज होळीचा सण असुनही ‘तुम्ही सणासुदीचे दारू का पिवून आला’ असे विचारले. यावर रागावलेला पती पत्नीला मारण्याकरीता पुढे आला. मात्र मुलगा सोमनाथ हा मध्ये आल्याने गोरख याची पत्नीला होणारी मारहाण थांबली. त्यानंतर गोरख हा मुलाला व पत्नीला शिविगाळ करत घराबाहेर निघून गेला. त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवन करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गट नं. 324 मधील त्यांच्या शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते.

सोमनाथ हा ऊसाला पाणी देत होता, तर त्याची आई ताराबाई ऊसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहचल्याचे त्याला आवाज देऊन सांगत होती. त्यांच्यात साधारण शंभर फुटाचे अंतर होते.

पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथचा ओरडल्याचा आवाज आल्याने ताराबाई पळत त्याच्याकडे गेल्या तर गोरख हा मुलगा सोमनाथ याला लोखंडी गजाने मारहाण करत होता. या मारहाणीत सोमनाथ याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी होवून बांधावर पडला होता.

मारहाणीचा आरडाओरड ऐकून शेजारी पाणी देण्यासाठी आलेले धावत घटनास्थळी आले. त्यांनी जखमी सोमनाथ याला उपचारासाठी शेवगाव व नंतर नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतांनाच त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ताराबाई गोरख करपे यांच्या फिर्यादीवरून पती गोरख किसन करपे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि. प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुजित ठाकरे हे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply